‘त्या’ युवकांच्या घरी खासदारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:43 IST2019-05-29T01:42:44+5:302019-05-29T01:43:36+5:30

पाणी प्यायला विहिरीत उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) येथे मागील आठवड्यात घडली. या युवकांच्या घरी मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनी सांत्वना भेट दिली. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

The meeting of MPs at the 'youth' house | ‘त्या’ युवकांच्या घरी खासदारांची भेट

‘त्या’ युवकांच्या घरी खासदारांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पाणी प्यायला विहिरीत उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) येथे मागील आठवड्यात घडली. या युवकांच्या घरी मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनी सांत्वना भेट दिली. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
स्वप्निल संजय पेठे (१५) व रवि चरणदास अडमाले (१५) या युवकांना तहान लागल्याने ते विहिरीत उतरले व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाणीटंचाईमुळेच या युवकांचा मृत्यू झाला असतांना एकाही अधिकाऱ्यांनी या युवकांच्या घरी भेट दिलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या आ. रवि राणा यांनी सोमवारच्या बैठकीत खडे बोल सुनावले होते. यावेळी जि.प. सदस्य प्रकाश साबळे, जितू दुधाणे, प्रशांत डहाणे, मनीष भुयार, धनंजय भुयार, धनंजय फरतोडे, श्रीधर कोहळे, गोपाल अळमते, भीमराव परतेकी आदी उपस्थित होते.

Web Title: The meeting of MPs at the 'youth' house

टॅग्स :Deathमृत्यू