अप्रशिक्षित युवक विकतात औषधी

By Admin | Updated: September 27, 2015 00:19 IST2015-09-27T00:19:03+5:302015-09-27T00:19:03+5:30

रुग्णांना वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टरांचा सिंहाचा वाटा असतो.

Medicines to sell untrained youth | अप्रशिक्षित युवक विकतात औषधी

अप्रशिक्षित युवक विकतात औषधी

नियमांना बगल : नागरिकांच्या आरोग्याला धोका
लोकमत विशेष

सुरेश सवळे चांदूरबाजार

रुग्णांना वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टरांचा सिंहाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे औषधी दुकानदारही त्यात भागीदार असते. मात्र प्रत्येक औषधी विक्रीच्या दुकानात फार्मासिस्ट असावा, त्यानेच औषधी विकावी, असा नियम आहे. बहुतांश औषधी विक्रीच्या दुकानांमध्ये नियमांना डावलत असल्याचे दिसत आहे. फार्मासिस्टच्या जागी कमी वेतनात दहावी, बारावी नापास व अप्रशिक्षित मुले काम करीत आहे. हा सर्वसमान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांकडून लिहून दिलेली औषधी नेमके ओळखणे, योग्य औषधी ग्राहकांना देणे, यासाठी कायद्यानुसार प्रत्येक औषधी विक्रीच्या दुकानांत फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ औषधी फक्त अधिकृत फार्मासिस्टकडून देण्यात यावी आणि बिलेदेखील त्यांच्याच स्वाक्षरीने देण्यात यावी, हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु खुलेआम या नियमांना डावलण्यात येत आहे. शहरातील एका जागरुक नागरिकाने दिलेल्यामाहितीत बऱ्याच धक्कादायक गोष्टींवर प्रकाश पडला. बहुतांश औषधी दुकानांच्या दुकानात दोन ते तीन इसम औषधी देण्याचे काम करतात. यातला नेमका फार्मासिस्ट कोण, हे कुणालाच कळत नाही. बहुतेक तो नसतानादेखील औषधांची विक्री सुरू असते. फार्मासिस्ट ओळखण्याची व्यवस्था नसल्याचा फायदा दुकानमालक घेत असल्याचे दिसत आहे. काही दुकानात फक्त सह्या करण्यासाठीच फार्मासिस्ट येतो. अप्रशिक्षित कर्मचारी ग्राहकांना औषधी विकतात. डॉक्टराने लिहून दिलेली औषधी या कर्मचाऱ्यांकडून मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे दुकानात फार्मासिस्टला सरकारी ओळखपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक असावे, अशी काही बंधने फुड अ‍ॅन्ड ड्रग्स विभागाने घालून देणे बंधनकारक झाले आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ
चांदूरबाजार येथील यंगस्टार चौकात असणाऱ्या एका मेडिकलमध्ये औषध उपलब्ध असतानाही ते रुग्णांना दिले जात आहे. ज्या डॉक्टरपासून औषध लिहून आणले. त्या डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाजूच्या औषधी दुकानात औषधी घेण्याचा सल्ला ग्राहकाला दिला जातो. एखाद्या रुग्णाला वेळेवर औषध पुरवठा न झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चांदूरबाजारच्या सर्वच मेडिकल स्टोअरमध्ये प्रशिक्षितांची नेमणूक केली आहे. मात्र एखाद्यावेळी ते गैरहजार राहतात. औषधांच्या आठ हजार कंपन्या आहे. या सर्व कंपन्यांची औषधी ठेवणे शक्य होत नाही. दवाखाना परिसरातील मेडिकलमध्ये संबंधित डॉक्टर नेहमी जी औषधी लिहून देतात तीच उपलब्ध करून द्यावी लागते.
- सुदेश भेले,
अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन, चांदूरबाजार.

Web Title: Medicines to sell untrained youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.