जिल्ह्यात मातृ वंदना योजनेचा ५० हजारांवर लाभार्थींना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:47+5:302020-12-11T04:37:47+5:30

या योजनेचा लाभ सर्व समाजाच्या निकषात बसणाऱ्या महिलांना देण्यात येत आहे. तसेच प्रथम खेपेच्या गर्भवती माता ज्या शासकीय-निमशासकीय सेवेतील ...

Matru Vandana Yojana benefits over 50,000 beneficiaries in the district | जिल्ह्यात मातृ वंदना योजनेचा ५० हजारांवर लाभार्थींना लाभ

जिल्ह्यात मातृ वंदना योजनेचा ५० हजारांवर लाभार्थींना लाभ

या योजनेचा लाभ सर्व समाजाच्या निकषात बसणाऱ्या महिलांना देण्यात येत आहे. तसेच प्रथम खेपेच्या गर्भवती माता ज्या शासकीय-निमशासकीय सेवेतील गर्भवती महिलांना कालावधी रजा व वेतन, मानधन नियमित दिले जातात. अशा खेपेच्या मातांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.

अमरावती जिल्ह्याचे १ जानेवारी ३१ २०१७ ते मार्च २०२१ पर्यंतचे उद्दिष्ट ५६११२ असून ५० हजार ४१२ लाभार्थ्यांना ९ डिसेंबर २०२० दरम्यान यात समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यांच्या स्वतंत्र बँक खात्यात ८१.२६ टक्के रक्कम जमा झालेली आहे. त्यापैकी महापालिकेत १३०३७ उद्दिष्टापैकी ११४४५ लाभार्थींच्या खात्यात ४ कोटी ८८ लाख ४६ हजार जमा झालेले आहेत. तसेच ग्रामीण भागात ४३ हजार ७५ लाभार्थी उद्दिष्टापैकी ३८ हजार ९६७ महिलांना १६ कोटी ३० लाख ५७ हजार रुपये डीबीटीमार्फत लाभ देण्यात आलेला आहे. याची टक्केवारी ९०.४६ इतकी आहे.

बॉक्स

काय दिली जाते मदत?

सर्व समाजाच्या घटकातील स्तनदा मातांना पहिल्या खेपेच्या गर्भवती मातांना तीन महिन्याच्या आता नोंदणी अनिवार्य आहे. प्रथमपूर्व प्रसव गर्भतपासणीत सोनोग्राफीनंतर २००० रुपये व बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी पेंटा लसीकरणानंतर तिसरा हप्ता २ हजार असा अनिदान दिला जातो.

कोट

ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा महिलांनी शहरी आरोग्य केंद्र, उपजिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुका आरोग्य केंद्र, पंचायत समिती येथे संपर्क साधावा.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.

तालुकानिहाय नोंदणी मिळालेला लाभ

अमरावती २३५७ १,०२,१५,००

अचलपूर ३५७३ १,६१,०५०००

अंजनगाव २९७१ १,२१,१३,०००

दर्यापूर २६६९ ९८,३६,०००

चांदूर रेल्वे १३०८ ५५,१७,०००

भातकुली १८६२ ७१,४१,०००

चांदूर बाजार ३५९९ १,५३,७८,०००

नांदगाव खं. १६७६ ७१,४२,०००

धामणगाव २४७४ ९५,७८,०००

वरूड ३३८८ १,४२,८०,०००

मोर्शी २५२१ १,२४,५६,०००

तिवसा १८७५ ७७,३१,०००

धारणी २८६१ ९६,३९,०००

चिखलदरा १८७० ७३,७२,०००

Web Title: Matru Vandana Yojana benefits over 50,000 beneficiaries in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.