शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात हिंदूवर अत्याचाराविरोधात अंबानगरीत भव्य निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:51 IST

प्रवीण पोटे-पाटील यांचे नेतृत्व : सकल हिंदू समाज, भाजपचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बांगलादेशातील हिंदू, अल्पसंख्याक जैन, बौद्ध, शीख यांच्यावर होत असलेले भ्याड हल्ले, हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तेथे मालमत्तेची लूट आणि महिलांवरील अत्याचार, अशा घटना गंभीर आणि चिंताजनक बनल्या आहेत. या सुनियोजित हल्ल्यांमुळे बांगलादेशातील जीवन असुरक्षित झाले आहे. या सर्व घटनांच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अमरावती शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री तथा भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे-पाटील यांनी केले.

बांगलादेशातील या अत्याचारांचा कायदेशीरपणे विरोध करणाऱ्या 'इस्कॉन'चे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना बांगलादेशातील हिंदूचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. बांगलादेशात हिंदू, शीख, जैन, बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचारविरोधात सकल हिंदू समाज व भारतीय जनता पार्टी अमरावती शहरतर्फे अमरावती येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, यात हिंदू शीख, बौद्ध जैन समाजातील महिलांवर अत्याचार, हत्या, संपत्ती लूटवर बांगलादेश सरकार कठोर कारवाई करत नाही. तसेच इस्कॉन मंदिराचे प. पू. स्वामी चिन्मय कृष्णदासजी महाराज यांना विनाकारण कारावासात डांबून ठेवण्याच्या विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित निषेध मोर्चामध्ये बांगलादेश सरकारचा निषेध करत असून, हिंदूवरील अत्याचार थांबवावे, असे प्रतिपादन भाजप अमरावती शहराध्यक्ष प्रवीण पोटे- पाटील यांनी केले. यावेळी प. पू. संदीप मुनी जैन महंत, प.पू. संत राजेशलाल साहेब, प.पू, नित्य हरिनाम प्रभुजी इस्कॉन, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज पातशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटनमंत्री बंटी पारवानी मंचावर उपस्थित होते. मुख्य वक्ता प्रा.डॉ. सतीश चाफले यांच्यासह प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, रवींद्र खांडेकर, चेतन पवार, प्रशांत शेगोकार, सतीश करेसिया, विवेक कलोती, अनिता राज, सुरेखा लुंगारे, गंगाताई खारकर आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोस्टकार्ड पाठविण्याचे अभियान राबविणार बांगलादेशच्या निषेध व्यक्त करण्याकरिता पोस्ट कार्ड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाल रंगाच्या पेनाने हस्ताक्षरात पत्र लिहून पाठविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हे अभियान १० ते २१ डिसेंबर पर्यंत १ लाखापेक्षा जास्त पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्याकरिता अमरावतीतील हिंदू, शीख, बौद्ध, जैन समाजाने सामील होऊन, हे अभियान राबवावे, असे आवाहन प्रवीण पोटे-पाटील यांनी केले.

टॅग्स :Amravatiअमरावती