शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाजार ओटे मटका व्यावसायिकांना विकले

By admin | Updated: May 18, 2015 00:14 IST

महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड अनागोंदी कारभार करुन बाजार व परवाना विभागाची लक्तरे वेशीवर ...

बडनेरा, इतवारा बाजारातील प्रकरण : गंगाप्रसाद जयस्वाल यांचा कारनामाअमरावती : महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड अनागोंदी कारभार करुन बाजार व परवाना विभागाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गंगाप्रसाद जयस्वाल यांनी येथील इतवारा आणि बडनेऱ्यातील बाजार ओटे मटका व्यवसायिकांना परस्पर हस्तांतरित करण्याची किमया केली आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.तहसील नजीकच्या खत्री कॉम्प्लेक्सची चौकशी सुरु असतानाच इतवारा बाजारातील ओटे प्रशासनाची परवानगी न घेता परस्पर हस्तांतरित केल्याची विश्वसनीय माहिती आहे. इतवारा बाजारातील जे बाजार ओटे परस्पर हस्तांतरित करण्यात आले त्यांचा पूर्वाश्रमीचा मटका व्यवसाय आहे. याच हेतुसाठी गंगाप्रसाद जयस्वाल यांना हाताशी धरुन बाजार ओटे नावे करुन घेतले आहेत. खरे तर हे बाजार ओटे छोट्या व्यावसायिकांना रोजगाराचे साधन म्हणून देण्याची नियमावली आहे. परंतु जयस्वाल यांना ‘माया’ जमा करण्याचा मोह आवरत नसल्याने त्यांनी बाजार व परवाना विभागच जणू विकून टाकण्याचा विडा उचलला होता की काय, असे दिसून येत आहे. बडनेऱ्यात सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात जागा शिल्लक राहिली नाही. त्यापैकी काही बाजार ओटे हे चक्क मटका व्यवसायिकांना देण्याची किमया जयस्वाल यांनी केली आहे. शिवणकाम करण्यासाठी छोटे दुकान थाटता यावे, याकरिता एका गरीब व्यक्तीने जयस्वाल यांना एक बाजार ओटा मागितला होता.संकु लातील राखीव गाळे विकलेबडनेरा नवीवस्तीतील मौलाना आझाद संकुलात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या कार्यालयासाठी राखीव असलेले एक गाळे गंगाप्रसाद जयस्वाल यांनी परस्पर करारनामे करुन विकल्याची माहिती आहे. हे गाळे महिलांच्या विविधांगी योजना राबविताना कामी यावे, हा उद्देश प्रशासनाचा होता. परंतु जयस्वाल यांनी हा गाळा एका व्यवसायिकाला हस्तांतरित करुन लाखोंचा व्यवहार केल्याची माहिती आहे.खत्री कॉम्प्लेक्स प्रकरणी चौकशी सुरु आहे. यात फौजदारी दाखल केली जाईल, यात दुमत नाही. परंतु बाजार ओटे वाटपात काही गैरप्रकार असेल तर तो शोधून काढताना पोलिसांत तक्रार दिली जाईल. बाजार ओटे परस्पर वाटप करणे ही गंभीर बाब आहे.चंदन पाटीलउपायुक्त, महापालिका