शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

परस्पर कापूस विक्रीने बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:50 IST

यंदा बोंडअळीने कापूस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. खासगी खरेदीत हमीपेक्षा अधिक भाव असल्याने पणनची केंद्र ओस पडलीत. खासगीकडे शेतकऱ्यांचा कल व परस्परच व्यापाऱ्यांना कापसाची विक्री होत आहे. यामुळे स्थानिक बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडत असल्याचे वास्तव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीनपट सेस कमी वसूल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी एक कोटींची वसुली : व्यापारी मालामाल

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा बोंडअळीने कापूस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. खासगी खरेदीत हमीपेक्षा अधिक भाव असल्याने पणनची केंद्र ओस पडलीत. खासगीकडे शेतकऱ्यांचा कल व परस्परच व्यापाऱ्यांना कापसाची विक्री होत आहे. यामुळे स्थानिक बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडत असल्याचे वास्तव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीनपट सेस कमी वसूल झाल्याचे चित्र आहे.मागील वर्षी अमरावती बाजार समितीला कापूस विक्रीतून एक कोटी ३५ लाख रुपये सेस मिळाल्याची माहिती आहे. त्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर २५ लाखांचाच सेस बाजार समितीला प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी सचिव बी.एल. डोईफोडे यांनी दिली. बाजार समितीतून कुठल्याही शेतमालाची काट्यावर मोजमाप व खरेदी झाली तर त्याचा १.५ टक्के सेस वसूल केला जातो. यातून १ टक्का सेस बाजार समितीला मिळतो. ०.५ टक्के सेस शासनाला जातो. परंतु, अमरावतीमध्ये १० जिनिंग प्रेसिंग नोंदणीकृत आहेत. अंदाजे ४५० रेचेधारक अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. मात्र, शासनाने कपाशीला सध्या प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रूपये हमी भाव आहे. व पणनच्या केंद्रांवर याच भावाने किंबहुना स्टेपलनुसार त्यापेक्षा कमी भावाने खरेदी केली जात असल्याने शेतकरी व्यापाºयांकडे वळत आहे. खासगीत सध्या ४३०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी होत आहे.बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील खासगी जिनिंगमधील व्यवहारांवर 'वॉच' नसल्याने नेमका किती कापूस खरेदी केला याची अधिकृत नोंद बाजार समिती मिळत नाही. खासगी व्यापारी शेतकºयांना अधिकृत पावतीसुद्धा देत नाहीत. मात्र कापसाचे व्यवहार नियमित होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेला लाखोंचा सेस यामुळे बुडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे.जिनिंग काट्यावर ३० कर्मचाºयांची नियुक्तीयेथील जिनिंगच्या काट्यावर सेस फंडाच्या वसुलीसाठी नियमन लागू असते. येथे रोज हजारो क्विंटल कापसावर प्रक्रिया होऊन हजारो गाठी तयार होतात. या ठिकाणी प्रत्येक जिनिंग प्रेसिंगच्या काट्यावर कर्मचारी नियुक्त आहेत. सद्यस्थितीत बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ३० कर्मचारी यावर लक्ष ठेवत असल्याचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी सांगितले.बँक स्टेटमेंट तपासल्यास सत्य येणार बाहेरया हंगामात अडते, खरेदीदाराने किती क्विंटल कापूस खरेदी केला, याचे बाजार समितीने बँक स्टेटमेंट मागून तपासणी केल्यास नेमका व्यापाºयांनी बाजार समितीचा किती सेस बुडविला, त्याचे सत्य बाहेर येईल. त्यामुळे सचिव व सभापतींनी या संदर्भाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.पणन महासंघाकडे शेतकºयांची पाठयंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचा घात केल्याने सरासरी उत्पन्नात ५० टक्के घट झाली. अशा परिस्थितीत पणन केंद्रांवरील जाचक निकष व त्या तुलनेत खासगी खरेदीत मिळत असलेला अधिक भाव यामुळे शेतकºयांनी पणनच्या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.बाजार समितीच्या वजनकाट्यावर व्यापाºयांनी कापूस खरेदी करावे, यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. जिनिंग प्रेसींगला या संदर्भात विचारणा करण्यात येईल. गेटपासशिवाय माल मोजमाप करू नये.- प्रफुल्ल राऊत, सभापती, बाजार समिती, अमरावती