बाजार समिती आवारात शेतकऱ्यांची तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:48+5:30
मागील आठ दिवसांपासून बाजार मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान बाजार मार्केट उघडण्यात आले. प्रत्येक दिवसाला फक्त दोनशे शेतकरी शेतमाल विक्रीकरिता आणतील, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने निर्गमित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणावर तब्बल शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला आहे.

बाजार समिती आवारात शेतकऱ्यांची तोबा गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. एका ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवावे, असे कडक आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, अशा ठिकाणी संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे सुद्धा राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र तरीसुद्धा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकºयांची गर्दी दिसून येत आहे.
मागील आठ दिवसांपासून बाजार मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान बाजार मार्केट उघडण्यात आले. प्रत्येक दिवसाला फक्त दोनशे शेतकरी शेतमाल विक्रीकरिता आणतील, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने निर्गमित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणावर तब्बल शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. त्यामुळे तो माल विकत घेताना शासनाने सुरक्षित अंतर ठेवण्याचे बजावले असतानासुद्धा त्याचे कुठलेही पालन येथील बाजार समितीच्यावतीने करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी वारंवार सुरक्षित अंतर ठेवण्याचे आदेश देऊनसुद्धा त्या आदेशाचे उल्लंघन येथील बाजार समितीमध्ये केल्याचे दिसून आले आहे.
बाजार मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, गर्दी वाढत असल्यामुळे शुक्रवारपासून नोंदणी करून दररोज नोंदीप्रमाणे माल विकत घेण्यात येईल. शंभरपेक्षा अधिक शेतकरी बाजार समितीत येणार नाहीत.
- बाबाराव बरवट,
सभापती