मोरखेड येथे विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST2021-09-14T04:15:41+5:302021-09-14T04:15:41+5:30

------------- खल्लार हद्दीतून मुलीला फूस लावून पळविले खल्लार : दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबेगव्हाण येथील मुलीला फूस ...

Marital harassment at Morkhed | मोरखेड येथे विवाहितेचा छळ

मोरखेड येथे विवाहितेचा छळ

-------------

खल्लार हद्दीतून मुलीला फूस लावून पळविले

खल्लार : दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबेगव्हाण येथील मुलीला फूस लावून पळवून मेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

सातेगाव येथे दुकान फोडले

वनोजा बाग : रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेगाव येथे दीपक श्रीकिसन कासट (५२) यांचे किराणा दुकान फोडून ३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. १२ सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. रहिमापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

मसोना येथे युवकाला मारहाण

परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसोना येथए मुलाला रुग्णालयात घेऊन जात असलेला गणेश बंसीलाल खडके (३०) याला क्षुल्लक कारणावरून राम बंसीलाल खडके (४९) याने शिवीगाळ करून मानेवर पट्टी मारून जखमी केले. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------------

मालवाहू ऑटोरिक्षाची युवकाला धडक

परतवाडा : सावळी दातुरा येथे हनुमान मंदिरानजीक अंजनगाव सुर्जीकडे जाणाऱ्या एमएच २७ बी डब्ल्यू ५८५३ क्रमांकाच्या मालवाहू ऑटोरिक्षा सूचना न देता चालकाने वळविल्याने दुचाकीवर स्वार सार्थक काठोळे (रा. सावळी दातुरा) याला धडक लागून तो जबर जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचे काका संदीप काठोळे (३०) यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Marital harassment at Morkhed