रवी राणा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठक
By Admin | Updated: January 4, 2016 00:17 IST2016-01-04T00:17:59+5:302016-01-04T00:17:59+5:30
शहरातील विविध विकास कामांचे नियोजन व रखडलेल्या समस्यांसंदर्भात शनिवारी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले होते.

रवी राणा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठक
अमरावती : शहरातील विविध विकास कामांचे नियोजन व रखडलेल्या समस्यांसंदर्भात शनिवारी आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅराथॉन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध कामाच्या निधीची तरतूद करून मार्गी लावण्यात येणार आहे.
या बैठकीत महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार व महापालिकेच्या बहूतांश विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. राणा यांनी विविध विषयासंदर्भात आलेल्या अडचणी दुर करण्यासाठी व रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी तसेच आतापर्यंत आलेल्या निधीचा खर्च कशाप्रकारे केला गेला, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या कामांची सध्यांची स्थिस्ती जाणून घेऊन भविष्यात लागणाऱ्या निधीच्या तरतुदीविषयी चर्चा करून अनेक विषय मार्गी लावले आहे. (प्रतिनिधी)