अमरावतीत रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:26 IST2020-09-26T16:25:12+5:302020-09-26T16:26:11+5:30
मराठा क्रांती ठोक मोर्चाने शंकरनगर येथे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानापुढे शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घोषणाबाजी केली.

अमरावतीत रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठा क्रांती ठोक मोर्चाने शंकरनगर येथे आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानापुढे शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य शासनाकडे लावून धरावा, अशी मागणी आमदारांकडे निवेदनातून करण्यात आली. त्यापूर्वी गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बडवून मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निघालेल्या मोर्चेकरांना पोलिसांनी अडविले होते.