अमरावतीत मराठा क्रांती ठोक मोर्चा; बडविले ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:58 AM2020-09-25T11:58:23+5:302020-09-25T12:04:20+5:30

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा पुकारणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने अमरावतीत जिजाऊ चौक येथे ढोल वाजवून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले.

Maratha Kranti Thok Morcha in Amravati | अमरावतीत मराठा क्रांती ठोक मोर्चा; बडविले ढोल

अमरावतीत मराठा क्रांती ठोक मोर्चा; बडविले ढोल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा पुकारणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने अमरावतीत जिजाऊ चौक येथे ढोल वाजवून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच करणाऱ्या मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिजाऊ चौक येथे रोखले. त्यामुळे तेथेच ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांसह ५ ढोलवादकांना ताब्यात घेतले. बुधवारी या आंदोलनाबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अंबादास गाचोडे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. खासदार, पालकमंत्री, आमदार अशा प्रमाणित लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. 
आरक्षणावरील स्थगिती त्वरित नवा अध्यादेश काढून रद्द करावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित मान्य करण्यात याव्यात. सारथी संस्थेला १५०० कोटी रुपये देण्यात यावे. शेतकऱ्याच्या मालास हमीभाव देण्यात यावा. मराठा समाजाचे स्वतंत्र वसतिगृह मंजूर करण्यात यावे आदी सकल मराठा समाजाच्या मागण्या आहेत.

Web Title: Maratha Kranti Thok Morcha in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.