जिल्हाभरात धनगरांचा रास्तारोको
By Admin | Updated: August 14, 2014 23:29 IST2014-08-14T23:29:50+5:302014-08-14T23:29:50+5:30
धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना

जिल्हाभरात धनगरांचा रास्तारोको
अमरावती : धनगर समाजाला शासनाने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.
स्थानिक नांदगाव पेठ येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्यावतीने आरक्षण मिळण्यासाठी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे नागपूर ते अमरावती मार्गावरील दोनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रस्त्याच्या कडेला वाहनांची लांबच लांब रीघ लागली होती. दिलीप एडतकर, संतोश महात्मे, उमेश घुरडे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाने हा रास्तो रोको केला.
रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली व काहीवेळेनंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. आंदोलनकर्त्यांमध्ये संजय कापडे, मनोज कचरे, अशोक गंधे, संजय लव्हाडे, राजू गंधे, अशोक इसळ, जानराव लव्हाळे, शेखर अवघड, संजय हेले, अनिल हिवे, अनिल कापडे, गजानन चुडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष तसेच मुलेदेखील उपस्थित होते. (प्रतिनिधी)