अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:28 AM2024-04-13T09:28:22+5:302024-04-13T09:29:35+5:30

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शहरातील अनेक भागात झाडे कोसळून पडली.

Many roads are closed due to stormy winds, schools are closed in amravati | अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी

अमरावतीत वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी

अमरावती - शनिवारी पहाटे शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शहरातील अनेक भागात झाडे कोसळून पडली.

इर्विन चौकातील भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रकार कार्यालय अक्षरशा जमीन दोस्त झाले, शहरातील बस स्थानकाकडून रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग बंद बस स्थानकांकडून इरविन चौकात जाणारा मार्गावर विजेच्या तारा व झाडे कोसळली.

खापर्डे बगीच्यातील राजवाडे विद्याभवनाच्या दोन्ही बाजूने झाडे पडली शाळेच्या भिंतीवर देखील झाड कोसळल्याने, शाळेकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद झाल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली, शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला विजेच्या तारा अक्षरशा जमिनीवर लोंबकळत आहे.

Web Title: Many roads are closed due to stormy winds, schools are closed in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.