लोकसभा पराभवावर मंथन, विधानसभा निवडणुकीवर लक्ष

By Admin | Updated: July 27, 2014 23:31 IST2014-07-27T23:31:58+5:302014-07-27T23:31:58+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या

Manthan on Lok Sabha poll, focus on assembly elections | लोकसभा पराभवावर मंथन, विधानसभा निवडणुकीवर लक्ष

लोकसभा पराभवावर मंथन, विधानसभा निवडणुकीवर लक्ष

राष्ट्रवादीची बैठक : निर्धार मेळाव्याची तयारी
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कशी वाढेल याविषयी लक्ष वेधले.
स्थानिक पंचवटी चौक नजीकच्या बाबासाहेब वऱ्हाडे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली.
वऱ्हाडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष व काही विशेष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे यांनी मागील चार वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या घडामोडींबाबत माहिती दिली. राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला असून कोणीही जिल्हाध्यक्ष ४ वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर काम करू शकत नाही, अन्यथा त्याचा ‘भेजा फ्राय’ होते असे ते म्हणाले. शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीत कशामुळे पराभव झाला या खोलात न जाता येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक संख्येने राष्ट्रवादीचे आमदार कसे बनतील याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करुन राष्ट्रवादीतीली अंतर्गत कलह कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
शरद तसरे यांनी राष्ट्रवादी स्थापनेपासून आपण शरद पवार यांच्याशी जुडलो आहे. आपण कधीही कोणाच्या विरोधात जात नसताना माझा का विरोध केला जातो, असा प्रश्न या बैठकीत उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे संघटन मजबूत होते. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा ठेवावी, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शरद तसरे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे, विजय काळे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष मेघा हरणे, नीलिमा महल्ले, संगीता ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन हिवसे, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, अरुण गावंडे, बाबुराव बेलसरे, आरीफ हुसैन, चंद्रशेखर देशमुख, श्रीपाल पाल, रवींद्र गायगोले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Manthan on Lok Sabha poll, focus on assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.