जयसिंग संस्थेवर मंगरोळे गटाचा झेंडा
By Admin | Updated: May 20, 2015 01:05 IST2015-05-20T01:05:57+5:302015-05-20T01:05:57+5:30
तालुक्यातील पथ्रोट येथील जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत वासंती मंगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलचा दणदणीत विजय झाला.

जयसिंग संस्थेवर मंगरोळे गटाचा झेंडा
अचलपूर : तालुक्यातील पथ्रोट येथील जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत वासंती मंगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलचा दणदणीत विजय झाला. तेरा पैकी बारा जागांवर अधिक मतांनी उमेदवार निवडून आले आहेत.
रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत कर्जदार गटामधून अजय भीमराव कडू (७७६ मते), रामेश्वर जगन्नाथसिंह टेहरे (६८९), मुरारी भागचंद अग्रवाल (७५९), ज्ञानेश्वर सोनाजी दिप्टे (६६६), राजेंद्र गणेश कान्हेरकर (६९८), रमेश साहेबराव कडू (६७०), अमोल रामेश्वर काळपांडे (७०५), शेख इस्त्राईल शे. कदीर (६६७) मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित गटातून कमलाकर दांडगे (७२०), महिला राखीव गटातून ज्योती अशोक काळपांडे (७३७), ओबीसी गटातून जयवंत गुणवंत हरणे (८१३), विमुक्त भटक्या जमाती गटातून महेंद्र सहदेवराव नागे (७८१) आदी एकूण १२ उमेदवार निवडून आले. त्यांच्या या निवडीबद्दल गावातून साईरत्न पॅनेलच्या वासंती मंगरोळे यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपंचायत सहसोसायटीवर झेंडा
अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाणाऱ्या पथ्रोट ग्रामपंचायतीवर वासंती मांगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलने घवघवीत यश प्राप्त केले. नंतर लगेच झालेल्या जयसिंग सहकारी विविध कार्यकारी संस्थेवर सलग विजय मिळविला. विरोधकांना धूळ चारत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणूक सहायक निबंधक एस.टी. केदार यांच्या नेतृत्वात पार पडली. साईरत्न पॅनलच्या वासंती मंगरोळे, सरपंच काशिनाथ सुरोडे, उपसरपंच गोपाळराव कावरे, योगेश दुबे, विलास मंगरोळे, शे. आरीफ, किशोर पटोकार, संतोष मागे, सुधीर खडेकर, धनराज मंगरोळे, राहुल कडू, गोपाल कडू, रुपलाल वरघट, राजा काकड विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)