महावितरणचा कारभार; वायरमन बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST2021-04-30T04:16:29+5:302021-04-30T04:16:29+5:30
फोटो पी २९ वाढोणा वाढोणा रामनाथ : येथील कारंजा लाड रोडवरील जनावरांचे पाणी पिण्याचे टाके कोरडे पडले आहे. ...

महावितरणचा कारभार; वायरमन बेपत्ता
फोटो पी २९ वाढोणा
वाढोणा रामनाथ : येथील कारंजा लाड रोडवरील जनावरांचे पाणी पिण्याचे टाके कोरडे पडले आहे. तेथील विद्युत पुरवठा बंद असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गाईबैलांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. अनेक वेळा येथील लाईनमन पवार यांना सूचित केले, परंतु काहीच झाले नाही.
टाक्याच्या आजूबाजूला शेकडो शेतकऱ्यांची ओलिताची जमीन आहे. त्यांची हिरवी पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. महावितरण मात्र निद्रावस्थेत आहे. गावात फक्त बिलाच्या वसुलीकरिता महावितरणचे कर्मचारी येतात. गावातील सर्वच रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. त्यामधील वायर विस्कळीत झाले आहेत. झाकण २४ तास उघडे राहते. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. यासंदर्भात उपविभागीय अभियंता विलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, वायरमनला पाठवतो, असे त्यांनी सांगितले.