पोळा उत्सवात ‘मामा-भांजा’ अव्वल
By Admin | Updated: September 2, 2016 00:14 IST2016-09-02T00:14:45+5:302016-09-02T00:14:45+5:30
श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित जनता कृषि तंत्र विद्यालयालयाच्या संयोजनात गुरुवारी पोळा उत्सव साजरा झाला

पोळा उत्सवात ‘मामा-भांजा’ अव्वल
शिवाजी संस्थेचा उपक्रम : शेतकऱ्यांचा सहभाग
अमरावती : श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित जनता कृषि तंत्र विद्यालयालयाच्या संयोजनात गुरुवारी पोळा उत्सव साजरा झाला या पोळा उत्सवात बैल सजावट स्पर्धेत रहाटगाव येथील मामा- भांजा बैल जोडी अव्वल ठरली.
स्थानिक रुरल इंन्स्टिट्युटच्या प्रांगणात झालेल्या पोळा उत्सवात ९ शेतकऱ्यांच्या बैलजोडीने हजेरी लावली होती. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी सदस्य एम. के. नाना देशमुख, अरविंद मंगळे, प्राचार्य नंदकिशोर चिखले, उद्धवराव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पोळ्यामध्ये उत्कृष्ट व सजवून आणलेल्या बैलजोड्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रथम पुरस्कार रहाटगाव येथील मामा- भांजा या बैल जोडीला स्व. रामराव मोहोड स्मृती प्रित्यर्थ धनंजय मोहोड यांच्या तर्फे शिल्ड, अहेर व बैलाचा साज तर जनता कृषि महाविद्यालाचे माजी प्राचार्य पी. व्ही. यावलीकर यांचे तर्फे १००१ रुपये प्रदान करण्यात आले. स्व. एन. जे. बापू देशमुख स्मृती प्रित्यर्थ विजय देशमुख यांच्याकडून १००१ रुपये, स्व. वामनराव काळे स्मृती प्रित्यर्थ विलास काळे यांच्याकडून रोख १००१ रुपये तसेच मधुकरराव अर्डक स्मती प्रित्यर्थ निलिमा ठाकरे यांच्यातर्फे ५०१ रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले. द्वितीय पुरस्कार येथील सचिन सातोकर यांच्या बैलजोडीने पटकाविला. राजाभाऊ उंबरकर यांच्याकडून शिल्ड, अहेर, बैलाचा साज तर अरविंद ठाकरे व विनोद भुंबर यांच्याकडून प्रत्येकी १००१ रुपये, बबनराव देशमुख यांच्याकडून रोख ५०१ रुपये प्रदान करण्यात आले. तृतीत बक्षीस शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या बैलजोडीने पटकाविले. या जोडीला रुरल इंन्स्टिट्युटचे प्राचार्यतर्फे ११११ रुपये तर शैलेश दांडगे यांच्यातर्फे ५०१ रुपये बक्षईस प्रदान करण्यात आले. चौथे क्रमांकाचे बक्षीस जनता कृषि महाविद्यालयाच्या बैलजोडीने मिळविला.(प्रतिनिधी)