पथ्रोट स्मशानभुमीत माजले रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:04+5:302021-07-21T04:11:04+5:30
फोटो पी २० पथ्रोट पथ्रोट ः अरुण पटोकार ** ** ** मृृृत्युनंतर चिरकाल विश्रांतीचे स्थान म्हणजे स्मशानभुमी होय. ...

पथ्रोट स्मशानभुमीत माजले रान
फोटो पी २० पथ्रोट
पथ्रोट ः अरुण पटोकार ** ** ** मृृृत्युनंतर चिरकाल विश्रांतीचे स्थान म्हणजे स्मशानभुमी होय. कधी कधी उपरोधाने माणुस शांती मिळावी ह्याकरीता स्मशानभुमीत जाण्यासाठी मरतो असे म्हटल्या जाते. हल्ली काही स्मशानभुमीची दुर्दशा स्थानीक ग्रामपंचायतीसह स्वंयसेवी संस्थानी पुढाकार घेतल्याने पालटल्याचे वृृृत्त वाचण्यात येते. सन २००४ मध्ये पथ्रोट स्मशानभुमीचा कायापालट झाला असता सौंदर्यीकरणाने स्मशाभुमी प्रेक्षणीय व पंचक्रोषीत नावाजलेली होती. सध्या स्थानीक ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचाच्या दुर्लक्षाने सगळीकडे गवत ऊगवल्याने पार रया गेली आहे. ** ** माजी मंत्री जगदिश गुप्ता मा.खा.अनंतराव गुढे यांचे स्थानिक विकासनिधी व सेवानिवृत्त कर्मचार्यासह दानदात्यांच्या दानातुन मृतदेह दहन करण्याकरीता पक्के सिमेंटचे शेड (एकाच वेळी ५ मृतदेह दहण करता येतील असे भव्य शेड) बांधण्यासह कुंपण भिंत व प्रतिक्षागृह उभारण्यात आले. स्मशानभुमीच्या आवारात सुशोभित उद्यान तयार केले होते. ग्रामपंचायत प्रशासन याची देखरेख करत होती. आजपावतोच्या प्रशासनाने चांगली देखभाल केली विद्यमान प्रशासन व सरपचानी दुर्लक्ष केल्याने स्मशानभुमीच्या आवारात सगळीकडे गवत उगवल्याने स्मशानभुमीची दुर्दशा ** झाल्याचा व साफसफाई नसल्याचा आरोप जलस्वराज्य योजनेचे माजी सचीव योगेश दुबे यानी केला आहे. या सह सदर्हु ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने मृतकावर अंत्यसंस्कार करताना व राख विझवण्याकरीता लागणारे पाणी बाहेरुन आणावे लागत असल्याने कायमस्वरुपी पाण्याच्या नळाची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे. ** ** ** ** मी स्वतः कोरोना काळात टँकरने पाणी बोलावुन उद्यानातील झाडाना पाणी टाकले कधी कधी शेजारी शेतकर्याकडुनही पाणी घेतले. वरच्यावर उगवलेले गवत काढुन घेतले. सध्याचे प्रशासन व सरपंच साफ दुर्लक्ष करीत आहे. - योगेश दुबे. पथ्रोट ** ** लवकरच कायमस्वरुपी देखरेख करणार्याची नियुक्ती करुन व ऊगवलेले गवत काढु - श्री. अतुल वाठ उपसरपंच पथ्रोट ग्रामपंचायत.**