सहा नगरपरिषदांमध्ये ‘महिलाराज’

By Admin | Updated: July 6, 2014 23:34 IST2014-07-06T23:34:57+5:302014-07-06T23:34:57+5:30

शहराचे महापौरपद तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला भूषवीत आहेत. तीन आठवड्यांच्या आत जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांची निवडणूक होत आहे. यापैकी सहा पालिकांमध्ये नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव

'Mahilaraj' in six Municipal Councils | सहा नगरपरिषदांमध्ये ‘महिलाराज’

सहा नगरपरिषदांमध्ये ‘महिलाराज’

दोन पदे सर्वसाधारण : तीन आठवड्यात निवडणूक
अमरावती : शहराचे महापौरपद तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला भूषवीत आहेत. तीन आठवड्यांच्या आत जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांची निवडणूक होत आहे. यापैकी सहा पालिकांमध्ये नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये ‘महिलाराज’ अस्तित्वात येणार आहे.
जिल्ह्यातील चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट, धामणगाव, चांदूररेल्वे पालिकांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ ५ जुलै २०१४ रोजी संपुष्टात आला. त्यांना त्याच दिवशी कार्यमुक्त करण्यात आले. प्रशासकाची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली. मात्र, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक क्षेत्र अधिनियम ५१ चे कलम ९ अन्वये अध्यक्षांचे पद कोणत्याही कारणाने रिक्त झाले असेल तर पोटकलम (२) ते (६) अन्वये रिक्तपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सभा बोलवावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील नऊही नगराध्यक्ष पदांसाठी ३० जुलैच्या आत निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. आता नव्याने होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देखील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सहा नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

Web Title: 'Mahilaraj' in six Municipal Councils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.