शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीने २७.३ तर बसपने पटकाविली २.६ टक्के मते

By admin | Updated: May 19, 2014 23:04 IST

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची टक्केवारी घटली असून विभागातील विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या पारड्यात २७.३ टक्के तर बसपने २.६ टक्के

जितेंद्र दखने - अमरावती

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची टक्केवारी घटली असून विभागातील विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या पारड्यात २७.३ टक्के तर बसपने २.६ टक्के मते पटकाविली आहेत.

विभागातील चार लोकसभा मतदारसंघात साधारणपणे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी लक्षात घेता २00९ च्या तुलनेत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येते. विभागातील विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना दहा हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येसुध्दा मोदी लाट रोखायची कशी? हीच विवंचना सध्या आघाडीच्या नेत्यांना लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकसभा निवडणूक अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरली. देशाला आघाडी शासनाशिवाय पर्यायच नाही, असे म्हणणार्‍यांना लोकसभा निवडणुकीचे निकाल चपराक देणारे आहेत. खुद्द भाजपच्या अपेक्षा आणि कल्पनेपेक्षाही भरभरून मते मतदारांनी त्यांच्या पदरात टाकले. पुढे चार ते पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत महायुतीचा जनाधार वाढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागणार आहे. लोकसभेच्या निकालातील आकडेवारीवरून मतांचा सर्वाधिक टक्का भाजपचा वाढल्याचे दिसून येते. त्या पाठोपाठ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप, मनसे, शेकाप याप्रमाणे इतर पक्षांना मिळालेल्या मतांचा विचार केला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)