Mahavish Khan arrested in police custody till November 20 | महविश खानला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महविश खानला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देजियाउल्ला खान, फिरदौसची कसून चौकशी। आतापर्यंत २५ मुलींचे नोंदविले बयाण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ मदरशातील मुलींचे व्हिडीओ व्हायरल करून पीडित मुलीचे नाव उघड करणारी आरोपी महविश खान अहमद खानला न्यायालयाने २० नोव्हेंबरला पोलीस कोठडी सुनावली. मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी संस्थाध्यक्ष जियाउल्ला खान व त्याची सहकारी फिरदौस शहाची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २५ मुलींचे बयाण नोंदविले आहे.
मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जियाउल्ला खान व फिरदौस यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, या गुन्ह्याविषयी ते काही बोलत नसल्याचे आढळून आले. शुक्रवारी नागपुरी गेट पोलिसांनी जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ व्हिडीओ व्हायरल करणारी महविश नामक महिलेस अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने आरोपी महविशला शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तिच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी महविशला २० नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस तिचा मोबाईल जप्त करून व्हिडीओ कसा व कुठे काढला, याबाबत चौकशी करणार आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे व पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत करीत आहेत.

Web Title: Mahavish Khan arrested in police custody till November 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.