Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचे निकाल स्पष्ट; भाजपचे नगराध्यक्ष किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:28 IST2025-12-21T14:26:25+5:302025-12-21T14:28:45+5:30
Amravati : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज अखेर आज हटले आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी निकाल स्पष्ट झाला आहे.

Maharashtra Nagar Palika Election Result: Results of Municipal Council and Nagar Panchayat elections in Amravati district are clear; How many BJP mayors?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज अखेर आज हटले आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी निकाल स्पष्ट झाला आहे. भाजपला ६, काँग्रेस २, शिंदेसेना, उबाठा, प्रहार व अपक्ष प्रत्येकी एक अशा बाराही ठिकाणचे निकाल लागले आहेत. वरूड नगरपरिषदमध्ये भाजपचे ईश्वर सलामे, मोर्शी येथे शिंदेसेनेच्या प्रतीक्षा गुल्हाने, धारणी येथे भाजपचे सुनील चौथम, चिखलदरा येथे काँग्रेसचे शेख अब्दूल शेख हैदर, अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या रूपाली माथने, अंजनगाव सुर्जी येथे भाजपचे अविनाश गायगोले, दर्यापूर येथे काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे, शेंदूरजना घाट येथे भाजपचे हरिभाऊ वरखडे, धामणगाव रेल्वे येथे भाजपच्या अर्चना राेटे, चांदूर रेल्वे नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार प्रियंका विश्वकर्मा, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीत उबाठा गटाच्या प्राप्ती मारोटकर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेत प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी झाले.
यावेळी तुरळक अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष स्वतंत्र लढले. शिवाय प्रहार, युवा स्वाभिमान, वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्ष व स्थानिक आघाड्या, बंडखोर व काही अपक्ष उमेदवारांमध्ये काट्याची लढत झाली. धामणगाव वगळता बहुतेक ठिकाणी अंतिम क्षणात तिहेरी लढती झाल्या.
जिल्ह्यात दोन टप्प्यात म्हणजेच २ व २० डिसेंबरला झाल्या. यामध्ये १५५ प्रभागात २७८ सदस्य निवडल्या जातील. सदस्यपदासाठी ६१२ स्त्री व ६३८ पुरुष असे १२५० तर १२ नगराध्यक्ष पदांकरिता ४७ स्त्री व २४ पुरुष असे उमेदवार उभे होते.