Maharashtra Election 2019 ; राजेश वानखडे यांच्या नामांकनाला लक्षवेधी उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:47+5:30
जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणा निनादल्या.

Maharashtra Election 2019 ; राजेश वानखडे यांच्या नामांकनाला लक्षवेधी उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शिवसेना, भाजप, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश वानखडे यांनी शुक्रवारी दुपारी तिवसा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शवून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भगव्या झेंड्यांनी आणि 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणांनी तिवसानगरी दुमदुमली होती.
यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार साहेबराव तट्टे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिलीप जाधव, बडनेरा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीती संजय बंड, भाजपा नेत्या निवेदिता चौधरी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव अतुल इंगळे, कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक विकास इंगोले, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, नाना नागमोते, भाजपचे नेते विवेक गुल्हाने, रविराज देशमुख, जयंत आमले, उमेश घुरडे, इंगळे, नितीन हटवार यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी - जय शिवाजी'च्या घोषणा निनादल्या.
भगवा फडकविण्याचे आवाहन
शिवसेना-भाजपला पसंती मिळत असल्याचे चित्र आतापर्यंत बघत आहोत. विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी राजेश वानखडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी खासदार अनंत गुढे यांनी केले. यावेळी प्रीती बंड यांनी संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीने राजेश वानखडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत करा आणि तिवसा मतदारसंघात भगवा फडकवा, असे आवाहन केले. शिवराय कुलकर्णी, साहेबराव तट्टे, दिलीप जाधव, श्याम देशमुख यांनीदेखील तिवस्यात भगवा फडकविण्याचे आवाहन केले.