शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंद : अमरावतीत कडकडीत बंद ! ठिकठिकाणी जाळपोळ, वाहतूक ठप्प  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:21 IST

भीमा कोरेगाव येथील आंदोलनानंतर संघटनांनी केलेले बंदचे आवाहन यशस्वी ठरले आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.

अमरावती - भीमा कोरेगाव येथील आंदोलनानंतर संघटनांनी केलेले बंदचे आवाहन यशस्वी ठरले आहे. अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. सुमारे दहा वाजता सर्व तालुका मुख्यालयापर्यंत पोहचणारे प्रमुख रस्ते जाम करण्यात आले. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळल्याने चित्र होते. अनेक आगारात एसटीबसेस आगारात जमा झाल्या आहेत. आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठा बंद केल्या. सर्व तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आल्या. 

अमरावती शहरातील विविध भागात जाळपोळीच्या घटना उघडकीस आल्या. सकाळी दहा वाजता जुण्या बायपासवरील अनेक वस्त्यांच्या रस्त्यावर बंदसाठी जाळपोळ करण्यात आली. शहरातील ईर्वीन चौकात अनेक संघटनांनी एकत्रित निषेध सभा घेतली. येथे पाच हजार लोकांची उपस्थिती असल्याची प्राथमिक माहिती आहे. युवकांनी मोटार सायकल रॅली काढून दुकाने बंद करण्याचासाठी पुढाकार घेतला. बहुतांश दुकाने बंद होती. बंद यशस्वी व्हावा यासाठी काही ठिकाणी साहित्याची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आल्या. 

नागपूर महामार्गावरील तिवसा शहर कडकडीत बंद पाळण्यात आल्या. मंगळवारी येथे मुख्यमंत्री व सरसंघचालकांचा पुतळा जाळण्यात आला होता. ती धग बुधवारी कायम होती. दर्यापूर शहरातून बाहेर जाणा-या सर्व मार्गावर वाहतूक अवरुद्ध करण्यात आली. येथे बाजारपेठ बंद करताना दुकानातील साहित्याची फेकाफेक क रण्यात आली. तर शाळांवर दगडफेकीच्या घटना उघडकीस आली. अचलपूर-परतवाडा शहर बंद करण्यात आले. येथील सर्व शाळाना सुटी देण्यात आली.  मिल स्टॉप वर चक्का जाम करण्यात आला. जुळया शहरातील सर्व बाजारपेठा बंद करण्यासाठी युवकांनी रॅली काढली. मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, येवदा, अंजनगाव सुर्जी सह अनेक गावांत वाहतूक ठप्प करण्यासाठी टायर जाळण्यात आले. धामणगाव शहर वगळता तालुक्यातील ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला. धामणगाव रेल्वे शहरात गुरुवारी बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर अंजनगाव शहरात एका मुस्लिम युवकास मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद