येवद्यात महादेव मंदिर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:36+5:302020-12-11T04:37:36+5:30
येवदा : स्थानिक रामचंद्र संस्थानच्या महादेव मंदिराचे कुलूप फोडून दानपेटीसह १५ हजारांची रोकड पळविणाऱ्या चोरांचा छडा येवदा पोलिसांनी काही ...

येवद्यात महादेव मंदिर फोडले
येवदा : स्थानिक रामचंद्र संस्थानच्या महादेव मंदिराचे कुलूप फोडून दानपेटीसह १५ हजारांची रोकड पळविणाऱ्या चोरांचा छडा येवदा पोलिसांनी काही तासांत लावला. मंदिरातून पळविलेले १५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य एक जण पसार झाला आहे.
अजय प्रभूदास रायबोले (२०) असे पोलिसांनी अटक केलेल्या आणि अब्दुल अकिल अब्दुल वहिद असे पसार आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी
भादंविचे कलम ३८०, ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी ज्ञानेश्वर वासुदेव वांदे (६५) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, ७ डिसेंबर रोजी रात्री १ च्या सुमारास मंदिरातील कुलूप तोडून पाच हजारांची दानपेटी व १५ हजार रुपयांची रोकड असा २० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ऋषी वाडी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला.
सदर गुन्हा दाखल होताच येवद्याचे ठाणेदार अमुल बच्चाव यांनी दोन पथके तयार केली. या पथकांमार्फत अजय रायबोले याला संशयावरून ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता, आरोपीच्या घरून रोख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.