शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची शानदार सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 9:18 PM

कुलगुरूंची उपस्थिती : फिरती ट्रॉफी व्हीएमव्ही आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय चमुला संयुक्तरीत्या प्रदान

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या युवा महोत्सवाची शानदार सांगता झाली. युवा महोत्सवाची फिरती ट्रॉफी येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयास संयुक्तपणे बहाल करण्यात आली. या महोत्सवात १८० महाविद्यालयांतील सुमारे २८०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित युवा महोत्सवाच्याच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून कुलगुरू मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, कुलसचिव तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रफुल्ल गवई, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे संचालक वसंत हेलावी रेड्डी, विद्यार्थी विकास संचालक दिनेश सातंगे, रासेयो संचालक राजेश बुरंगे, कमल भोंडे, राजीव बोरकर, जयश्री वैष्णव, युवामहोत्सव समन्वयक सुधीर मोहोड व सहसमन्वयक विनोद गावंडे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू चांदेकर यांनी युवा महोत्सव नवनवीन शिकण्यासाठी उत्तम व्यासपीठ असून या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिकण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.भारतीय शास्त्रीय गायन, स्वर वाद्य, शास्त्रीय वाद्य संगीत, तालवाद्य, सुगम संगीत, पाश्चिमात्य गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गान, पाश्चिमात्य वाद्य संगीत, फोक आॅर्केस्ट्रा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्न मंजूषा, वक्तृृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, प्रसव स्किट, माईम, मिमिक्री, फाईन आर्ट्स, आॅन दी स्पॉट पेंटीग, कोलाज, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, स्थापना, मेहंदी या कला प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त कलावंत व स्पर्धकांना कुलगुरू मुरलीधर चांदेकर व उपस्थित मान्यवरांच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. युवा महोत्सवाची फिरती ट्रॉफी कुलगुरुंनी नाणेफेकद्वारे प्रथम सहा महिने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि नंतरच्या सहा महिन्यांकरिता शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या चमुला प्रदान केली.यावेळी प्रस्ताविक सुधीर मोहोड यांनी तर, दिनेश सातंगे व वसंत हेलावी रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय उज्ज्वला देशमुख यांनी केला. राजीव बोरकर व प्रफुल्ल गवई यांनी बक्षीस वितरण समारंभाचे तर, देवळाणकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. आभार विनोद गावंडे यांनी मानले. समारोप कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी भारत कºहाड, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ