फूस लावून पळविले; तरुणीवर शारीरिक अत्याचार
By प्रदीप भाकरे | Updated: April 24, 2023 19:42 IST2023-04-24T19:41:55+5:302023-04-24T19:42:19+5:30
अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील एका ...

फूस लावून पळविले; तरुणीवर शारीरिक अत्याचार
अमरावती : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील एका गावात तिच्यासोबत शारीरिक बळजबरी करण्यात आली. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी २३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
गोकुल गजानन पटवे (वय २९) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, गोकुलने पीडित १७ वर्षीय मुलीला तिच्या घराजवळून दुचाकीवर बसवून पळवून नेले. तो तिला धारणी तालुक्यातील एका गावात घेऊन गेला. येथे पाच दिवस राहिल्यावर तो तिला घेऊन त्याच्या घरी गेला. २६ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत सोबत राहत असताना गोकुलने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडित मुलीने पथ्रोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.