रेल्वे गाड्यांतील ‘लगेज’ सुविधा खासगी कंपनीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:59+5:30
रेल्वे प्रशासनाने ज्या रेल्वे स्थानकावर पार्सल सुविधा आहे, अशा कार्यालयाच्या मासिक उत्पन्नाचा आढावा घेत जेथे उत्पन्न कमी तेथे पार्सल सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत शेगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आदी रेल्वे स्थानकावरील पार्सल सुविधा बंद केली आहे.

रेल्वे गाड्यांतील ‘लगेज’ सुविधा खासगी कंपनीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे गाड्यांमधील ‘लगेज’ सुविधा खासगी कंपनीकडे सोपविल्यामुळे वर्षांनुवर्षांपासून लहान-मोठ्या रेल्वे स्थानकावरील अपेक्षित उत्पन्न न देणारे पार्सल कार्यालय बंद करण्यात आले आहे. यात बडनेरा रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालय बंद झाल्याने ‘लगेज’ पाठविणे ठप्प आहे. यात घाऊक व्यावसायिक, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
रेल्वे प्रशासनाने ज्या रेल्वे स्थानकावर पार्सल सुविधा आहे, अशा कार्यालयाच्या मासिक उत्पन्नाचा आढावा घेत जेथे उत्पन्न कमी तेथे पार्सल सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागांतर्गत शेगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आदी रेल्वे स्थानकावरील पार्सल सुविधा बंद केली आहे. ‘लगेज’ डब्यातून मोटरसायकल, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, घरगुती वापराची भांडी, साहित्य, पुस्तकांचे गठ्ठे आदी साहित्य पाठविले जाते. ही सुविधा स्वस्त आणि कमी वेळेत मिळत असल्याने अनेक जण पार्सल याच डब्यातून बुकींग करून पाठवितात. मात्र, उत्पन्न कमी असल्याचा आधार घेत रेल्वे प्रशासनाने बहुतांश लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधील ‘लगेज’ खासगी कंपन्यांना लिजवर दिले आहेत.
बडनेरा रेल्वे स्थानकावरील पार्सल सुविधा बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या गाव - खेड्यांतील नागरिकांना रेल्वेच्या लगेजपासून वंचित राहावे लागत आहे. विदर्भातून मुंबईकडे पाठविला जाणारा भाजीपाला दुसºया दिवशी मुंबईत पोहचत होता. तथापि, लहान-मोठ्या रेल्वे स्थानकावरील ‘लगेज’ची सुविधा बंद केल्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.
अमरावती रेल्वे स्थानकावर ‘लगेज’ सुरू
देश किंवा राज्यात कोणत्याची रेल्वे स्थानकावर पार्सल, भाजीपाला व अन्य साहित्य पाठविण्याची व्यवस्था अमरावती रेल्वे स्थानकावर कायम ठेवली आहे. येथील पार्सल कार्यालयाचे उतन्न अधिक असल्यामुळे सुविधा पूर्ववत ठेवली आहे. मात्र, २४ तास रेल्वे गाड्यांचे आवागमन असलेल्या बडनेरा रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
खासगी कंपन्यांचे ठरावीक ‘लगेज’ला प्राधान्य
रेल्वे गाड्यांच्या पार्सल डब्यांतून ‘लगेज’ पाठविण्यासाठी खासगी कंपन्यांकडून ठरावीक साहित्य, वस्तूलाच प्राधान्य दिले जात असल्याची ओरड आहे. खासगी कंपनीकडून महिनाभर जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांच्या पार्सल डब्यांचे बुकिंग राहत आहेत. परिणामी घाऊक व्यापारी तथा शेतकºयांचा माल मोठ्या शहरांतील बाजारपेठेत रेल्वेच्या पार्सल सुविधेमधून पाठविण्यास प्राधान्य दिले जात नाही. भाजीपाला व अन्य नाशवंत साहित्य दुसºया दिवशी पोहचणे आवश्यक असताना खासगी कंपन्यांकडून शेतमाल पाठविण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड आहे.
गत पाच वर्षांपासून रेल्वेच्या ‘लगेज’ डब्यातून मुंबई, नाशिक येथे कडीपत्ता पाठविला जायचा. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावरील पार्सल सुविधा बंद झाल्यामुळे आता अमरावती येथून बुकिंग करावा लागतो. कडीपत्ता दुसºया दिवशी पोहचेल याची शाश्वती नाही. बरेचदा नुकसानदेखील झाले आहे.
- भास्कर आखरे,
शेतकरी, निंभोरा लाहे