आदिवासी कन्यांद्वारे निर्मित लाखेच्या बांगड्यांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:23 IST2017-08-13T23:22:25+5:302017-08-13T23:23:08+5:30
कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी आदिवासी माता व बालकांना पोषण आहार कसा दिला, .....

आदिवासी कन्यांद्वारे निर्मित लाखेच्या बांगड्यांचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : कुपोषणाचा कलंक पुसण्यासाठी आदिवासी माता व बालकांना पोषण आहार कसा दिला, याची प्रत्यक्ष माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी जाणून घेतली.व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने आदिवासी मुलींनी तयार केलेल्या ‘लाखेच्या बांगड्या’देखील यावेळी चर्चेत राहिल्या.
येथे राष्टÑीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन व लाभार्थ्यांना लाभ वितरण शिबिराचे आयोजन पालिका भवन येथे करण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. पानसरे, अचलपूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी. पाटकर, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, वकील संघाचे तरूण शेंडे, भोला चव्हाण, रवींद्र खोजरे, धर्मेंद्र यावले, सुवर्णा गवई, महिला न्यायाधीश पतिंगे उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी बालविकास प्रकल्प कार्यालय, व्याघ्र प्रकल्प, पेसा कायदा, कृषी विभाग, बँक आदी महत्त्वाच्या कार्यालयांचे टॉल्स लागले होते. मेळघाटातील बालकांच्या कुपोषणासह दिला जाणाºया आहाराची माहिती न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली. ‘मणाक’चे कैलास घोडके, विलास दुर्गे, योगेश वानखडे, आशा निंबाळकर, सालेहा खान, शीला दहीकर, कमल पांडे, पडोने, कौसल्या विचलकर, राजा खंडारे उपस्थित होते.
न्यायमूर्तींनी रोखीने खरेदी केले पापड
परतवाडा : न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी कार्यक्रमानंतर अंबिका लॉन येथे लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांना महिला बचत गटाने पापड भेट दिले. त्यांनी ते स्वीकारल्यावर त्यांनी त्याची किंमत विचारली. पण ही भेटवस्तू असे सांगितले. यावर मला भेटवस्तू नको, त्या पाकिटावर असलेली किंमत त्यांनी पाहिली व पूर्ण पैसे चुकविले. यावेळी उपस्थित असलेले वकिल व न्यायाधीशही आश्चर्यचकीत झाले.
व्याघ्र प्रकल्पाच्या बांगड्या चर्चेत
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने स्थानिकांना उपजीविका प्रशिक्षण देण्यात येते. हरिसाल येथे ७० युवक-युवतींना लाखेच्या बांगड्या, गाईड्स, आदरतिथ्य प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी लाखेच्या बांगड्यांचे टॉल्स येथे लावण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे, प्रदीप बाळापुरे, पंजाब गवई यांनी प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. सुशीला धिकार व भुलई कास्देकर या दोन युवती लाखेच्या बांगड्या बनवीत होत्या.