यंदा मे महिन्यात सर्वात कमी तापमान
By Admin | Updated: May 18, 2014 23:13 IST2014-05-18T23:13:42+5:302014-05-18T23:13:42+5:30
मे महिना म्हटला की तापमनाचा कहर आठवतो. परंतु २०१४ चा मे महिना मात्र बराच सुसह्य ठरला. यंदाच्या मे महिन्यात पाच वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

यंदा मे महिन्यात सर्वात कमी तापमान
अमरावती : मे महिना म्हटला की तापमनाचा कहर आठवतो. परंतु २०१४ चा मे महिना मात्र बराच सुसह्य ठरला. यंदाच्या मे महिन्यात पाच वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. परंतु हवामानाच्या अंदाजावरून भविष्यात वाढणारे तापमान त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. पर्यावरणातील बदल या तापमानातील चढ-उताराला कारणीभूत ठरत आहे. २०१० च्या मे महिन्यातील दुसरा आठवडा व यंदाच्या मे महिन्यातील तापमानाची तुलना केली असता पाच वर्षांतील सर्वात कमी तापमान यंदाच्या मे महिन्यात असल्याचे दिसून आले. निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे हवामान बदलत आहे. पावसाचे वेळापत्रक, हिवाळ्यातील थंडी व उन्हाळ्यातील तापमानात सुसूत्रता राहिलेली नाही. मे २०१० मध्ये ४५ डिग्री तापमानाची नोंद झाली होती व हे तापमान महिनाभर कायम होते. मात्र यंदा अजूनही तापमान वाढलेले नाही.