शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नंदनवनात सर्वांत कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मात्र पाऊस माघारला. सद्यस्थितीत जिल्ह्यात चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली. यामध्ये सर्वांत जास्त २०२ टक्के पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला, तर सर्वांत कमी ८३ टक्के पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला.जिल्ह्यात १ ...

ठळक मुद्देनांदगावात सर्वाधिक २०२ टक्के पाऊस : चिखलदरा वगळता सर्वच तालुक्यांची सरासरी पार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मात्र पाऊस माघारला. सद्यस्थितीत जिल्ह्यात चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली. यामध्ये सर्वांत जास्त २०२ टक्के पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला, तर सर्वांत कमी ८३ टक्के पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला.जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै या कालावधीत २६१.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३३४.४ मिमी पाऊस पडला. ही १२७.७ टक्के सरासरी आहे, तर वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ४१.१ टक्के आहे. मागील वर्षी याच दिनांकाला फक्त १४० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा १९६ मिमी पाऊस जास्त आहे. सद्यस्थितीत यंदा अमरावती तालुक्यात ३१४ मिमी, भातकुली २७८, नांदगाव खंडेश्वर ५०६, चांदूर रेल्वे ४२२.५, धामणगाव रेल्वे ३३५.५, तिवसा ३००.२, मोर्शी २८७.३, वरुड ३१७.७, अचलपूर २९४.९, चांदूर बाजार २९३.१, दर्यापूर ३३२.५, अंजनगाव सुर्जी २८१.६, धारणी ३६५.५, तर चिखलदरा तालुक्यात ३५२.७ मिमी पाऊस कोसळला.विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत ४२६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, फक्त ३५२.७ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली असताना, या नंदनवनात मात्र अपेक्षित पावसाच्या ८३ टक्केच पाऊस पडला. किंबहुना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वांत शेवटच्या म्हणजेच चौदाव्या स्थानी चिखलदरा आहे. अलीकडच्या पाच वर्षांत चिखलदरा पावसात माघारत असल्याची बाब चिंताजनक आहे. मेळघाटच्या या पर्वतराजीमध्ये पावसाने सर्वत्र हिरवळ असली तरी नैसर्गिक वाहणाऱ्या खळाळत्या पाण्यासाठी मात्र पर्यटकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.१३ तालुक्यांची सरासरी पारजिल्ह्यात सद्यस्थितीत १२८ टक्के पाऊस पडला असला तरी चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३२.८ टक्के, भातकुली ११०.८, नांदगाव खंडेश्वर २०२, चांदूर रेल्वे १७०, धामणगाव रेल्वे १३६, तिवसा १२२, मोर्शी १११, वरूड १०७, अचलपूर १२४, चांदूर बाजार १२७, दर्यापूर १५०, अंजनगाव सुर्जी १४७, धारणी ११३ टक्के, तर चिखलदरा तालुक्यात फक्त ८३ टक्के पाऊस पडलाआठवडाभर सार्वत्रिक पावसाची शक्यतावायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, गुजरात, छत्तिसगड व ओरिसाच्या उत्तर किनाºयावर चक्राकार वारे कायम आहेत. त्यामुळे विदर्भात १७ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. १८ ते २० जुलै बहुतेक ठिकाणी हलका ते भारी पाऊस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची ही स्थिती एक आठवडाभर अशीच राहणार असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.