तरुणीशी ओळख, प्रेम व बलात्कार; गर्भपातानंतर म्हणे, ‘मारून टाकीन!’

By प्रदीप भाकरे | Updated: February 2, 2024 19:34 IST2024-02-02T19:34:26+5:302024-02-02T19:34:35+5:30

आरोपी नोकरदार : पीडिताचा अज्ञाताकडून पाठलाग

Love Rape and then threat of life, crime in amravati | तरुणीशी ओळख, प्रेम व बलात्कार; गर्भपातानंतर म्हणे, ‘मारून टाकीन!’

तरुणीशी ओळख, प्रेम व बलात्कार; गर्भपातानंतर म्हणे, ‘मारून टाकीन!’

अमरावती: एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे सर्वस्व लुटण्यात आले. त्यातून तिला गर्भधारणा झाली असता तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. ही धक्कादायक घटना येथे १ फेब्रुवारी रोजी रात्री उघड झाली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राहुल वानखडे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

यातील पीडित महिलेची आरोपीसोबत इन्कम टॅक्सच्या कामानिमित्त भेट झाली होती. त्याने तिच्या ऑफिसमधून तिचा मोबाइल क्रमांक मिळविला. तो फोन करू लागल्याने दोघांची ओळख झाली. दरम्यानच्या काळात ती आरोपीच्या आईशीदेखील बोलली. त्यावेळी त्याचे तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी केली.

पुढे त्याच्या आईनेदेखील तरुणीशी मोबाइलवरून संवाद साधत ‘तू सून म्हणून आवडलीस, माझ्या मुलाचे लग्न तुटलेले आहे, असे ती म्हणाली. त्याने देखील तो घटस्फोटित असल्याचे तरुणीला सांगितले. दरम्यान, २८ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपी राहुल वानखडे तिच्या घरी आला. त्यावेळी ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सतत चार दिवस त्याने अत्याचार केला.

Web Title: Love Rape and then threat of life, crime in amravati