शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

चिखलदऱ्यातील ४० गावांत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:11 AM

तालुक्यात पाणीपुरवठा करणाºया योजना कोरड्या पडल्याने ४० आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुºया टँकरमुळे पाण्यासाठी भटकंती, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.

चिखलदरा : तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कोरड्या पडल्याने ४० आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या टँकरमुळे पाण्यासाठी भटकंती, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांचे होणारे वाद पाहता टँकरचे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे.तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये मार्चपासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी आठ गावे टँकर्ससाठी प्रस्तावित केली आहेत. प्रत्यक्षात मात्र पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. तालुक्यातील मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, एकझिरा, बिहाली, कोहाना, भांद्री, खडीमल, गौलखेडा बाजार, कुलंगना, मोथा, पस्तलाई, नागझिरा, वस्तापूर, मोरगड, आलाडोह, शहापूर, अंबापाटी, खटकाली, झिंगापूर आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिखलदरा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती अंतर्गत १६० गावांचा समावेश आहे.पाण्यावरून भांडणेअनियमित पाणीपुरवठ्यामुळे आदिवासींमध्ये रोज भांडणे होत आहेत. गुरुवारी सोमवारखेडा येथे टँकरने कमी फेºया केल्यामुळे आदिवासींमध्ये पाण्यावरून वाद निर्माण झाला. अहमदनगर व हैद्राबाद येथील कंत्राटदाराने जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्याचा आॅनलाइन कंत्राट घेतल्यामुळे नियोजन कोलमडले. टँकरऐवजी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करून मोठी रक्कम शासनाकडून उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे. कमी अधिक प्रमाणात पाणी मिळाल्यावरून आदिवासींमध्ये वाद होत असल्याने विहिरीत सोडले जात आहे.हातपंप कोरडेतालुक्यात एकूण ३३७ हातपंप आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने हातपंप कोरडे पडलेत. २५ हातपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पंचायत समितीमधून सांगण्यात आले.झेडपीचे टँकर उभेचजिल्हा परिषद अमरावती येथून चिखलदरा तालुक्यासाठी चार टँकर उपलब्ध करून देणार असल्याचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी एकच टँकर पाठविण्यात आला. उर्वरित एमएचयू ६२२८, ६३४१, ६३४२ तीन क्रमांकाचे टँकर पाठविण्यात आले नाही. मेळघाटात प्रचंड पाणीटंचाई असताना तीनही टँकर जिल्हा परिषदमध्ये उभे आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई