घुईखेड येथे लोटला भक्तांचा महासागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:01:00+5:30

श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ४.३० वाजता बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर मिरवणुकीत श्री बेंडोजी बाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि डंबेल्सचे सादरीकरण केले. लेझीम, बँड, भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासीक पालखी व दिंड्या एचएससी व्होकेशनल महाविद्यालयामागील संस्थानच्या शेतामध्ये पोहचल्या.

Lot of devotee's ocean at Ghuikhed | घुईखेड येथे लोटला भक्तांचा महासागर

घुईखेड येथे लोटला भक्तांचा महासागर

ठळक मुद्देराज्यभरातून १४५ दिंड्या : संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा, तरूणाईने जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक भक्तांनी घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे रविवारी दर्शन घेतले. मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन व भव्यदिव्य दहिहांडी महोत्सव पार पडला. येथील ऐतिहासीक पालखी सोहळयात राज्यभरातून १४५ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी दुमदुमली होती.
श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ४.३० वाजता बेंडोजी महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर मिरवणुकीत श्री बेंडोजी बाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि डंबेल्सचे सादरीकरण केले. लेझीम, बँड, भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासीक पालखी व दिंड्या एचएससी व्होकेशनल महाविद्यालयामागील संस्थानच्या शेतामध्ये पोहचल्या. परंपरेनुसार चिंचीच्या झाडाजवळ दहिहांडीचा कार्यक्रम सायंकाळी ५.४५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा लाभ लाखो भक्तांनी घेतला. यात्रेत भव्य आकाश पाळणा, खेळणीचे दुकान व लोकपयोगी विविध साहित्यांची दुकाने सजली होती. यात्रेकरूंनी संसारपयोगी साहित्य खरेदी करताना दिसून आले. तर अनेकांनी आकाश पाळण्यासह इतर मनोरंजनात्मक खेळांचा आनंद लुटला. यात्रेत कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी तळेगाव दशासर येथील ठाणेदार रीता उईके, सहाय्यक ठाणेदार संदीप बिरांजे, एएसआय वसंत राठोड यांनी सांभाळली. दहिहांडीपूर्वी निघालेल्या पालखी मिरवणुकीत जागोजागी स्टॉल लावून राजे शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेतर्फे चहा व कृष्ण अवधुत संस्थान घुईखेड, ग्रामपंचायत प्रशासन, एचएससी व्होकेशल विभागातर्फे पाणी व शरबतचे वाटप करण्यात आले. घुईखेड आरोग्य उपकेंद्रातर्फे आरोग्य सेवा देऊन औषधांचे वाटप करण्यात आले.

पालखीची एक किलोमीटरपर्यंत लांब रांग
पालखी मिरवणूक निघाल्यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग होती. मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त सहभागी झाले होते. सायंकाळी मंदिरात नेत्रदीपक रिंगण सोहळा सुध्दा पार पडला.
सायंकाळी ७ वाजता झालेल्या महाआरतीचा मान विठ्ठल रूख्मीणी महिला भजनी मंडळ, यवतमाळ यांना मिळाला. या महाआरतीला व भव्य दिव्य सोहळ्याला काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती.

Web Title: Lot of devotee's ocean at Ghuikhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.