वादळी पावसाने लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: May 8, 2014 00:48 IST2014-05-08T00:48:14+5:302014-05-08T00:48:14+5:30
नजीकच्या शेंदुरजना खुर्द येथे शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान
तळेगाव दशासर : नजीकच्या शेंदुरजना खुर्द येथे शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
तुफानी वादळात शेंदुरजना खुर्द येथील इंदिरा नगरातील शंकर मेश्राम यांच्या घरावरील टिनाचे छप्पर उडाले असून एका इसमाच्या पायावर टिनावरील दगड पडल्याने त्याचा पाय फॅक्चर झाला. घरातील टीव्हीदेखील फुटला. येथील लताबाई साबळे,शंकरराव शेंडे, विजय टेंभुर्णे, गीताबाई भेंडारकर, प्रकाश पोटे यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. तसेच परिसरातील तळेगाव मोहना, वाढोणा, महिमापूर या भागातही वादळाने थैमान घातले. परंतु येथे नुकसान झाले नाही. वातावरणातील आकस्मिक बदलामुळे अनेकदा नागरिक अडचणीत आले आहेत.