प्रेमचंद लुनावत यांना भगवान महावीर अवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:44 IST2018-03-24T23:44:09+5:302018-03-24T23:44:09+5:30

येथील जैन बहुउद्देशीय संस्थेद्वारा दिला जाणारा भगवान महावीर अवार्ड यंदा प्रेमचंद लुनावत यांना जाहीर झाला आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री वर्धमान स्तानक येथे आयोजित कार्यक्रमात युवा स्वाभिमानच्या अध्यक्ष नवनीत राणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Lord Mahavir Award for Premchand Lunavat | प्रेमचंद लुनावत यांना भगवान महावीर अवार्ड

प्रेमचंद लुनावत यांना भगवान महावीर अवार्ड

आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील जैन बहुउद्देशीय संस्थेद्वारा दिला जाणारा भगवान महावीर अवार्ड यंदा प्रेमचंद लुनावत यांना जाहीर झाला आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री वर्धमान स्तानक येथे आयोजित कार्यक्रमात युवा स्वाभिमानच्या अध्यक्ष नवनीत राणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेद्वारे दिला जाणारा यावेळचा हा दुसरा पुरस्कार आहे. यापूर्वी पहिला पुरस्कार अ‍ॅड. देवराज बोथरा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मिनी महापौर सुरेखा लुंगारे, लविना जैन, जसवंतराज लुणीया, श्रीराजे लुनावत, अ‍ॅड. विजय बोथरा, भरत खजांची, श्री अनिल सुराणा, अभिनंदन पेंढारी, प्रकाश भंडारी, निलम लुणीया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात भगवान महावीर यांच्या चरित्रावर भजनसंध्या होईल. याचा लाभ घेण्याचे आवाहन जैन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिनंदन पेंढारी यांनी केले आहे.

Web Title: Lord Mahavir Award for Premchand Lunavat