पेट्रोल पंपावर लुटमार

By Admin | Updated: December 3, 2015 00:12 IST2015-12-03T00:12:14+5:302015-12-03T00:12:14+5:30

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातून पैसे हिसकावून पळ काढला.

Looter on petrol pumps | पेट्रोल पंपावर लुटमार

पेट्रोल पंपावर लुटमार

मालवीय चौक : फाटक्या नोटीसाठी वाद
अमरावती : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या हातून पैसे हिसकावून पळ काढला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मालवीय चौकातील पेट्रोल पंपावर घडली. पसार झालेले आरोपी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शहर कोतवाली पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
मालवीय चौकात जाजोदिया यांचा पेट्रोल पंप आहे. तेथे जाकीर कॉलनीतील रहिवासी फिरोज खान बिसमिल्ला खान (२३) हा कर्मचारी मंगळवारी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करीत होता. दरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंप बंद करताना दोन युवक एका दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आले. त्यांनी फिरोजला ३० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. त्यांनी फिरोजला ५० रुपये दिले. फिरोजने दोन दहाच्या नोटा दुचाकीस्वाराला दिल्या. मात्र, एक दहाची नोट फाटकी असल्यामुळे दुचाकीस्वारांनी ती नोट परत केली.

तीन हजार रूपये घेऊन पसार
अमरावती : फाटक्या नोटीवरून फिरोज व दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. फिरोजने ती नोट बदलून देण्यासाठी पैशांच्या बॅगमध्ये हात टाकला असता त्या अज्ञात दुचाकीस्वाराने फिरोजच्या हातातील ३ हजार १६५ रुपये हिसकावून पलायन केले. फिरोजने या घटनेची माहिती तत्काळ पेट्रोलपंप मालकाला देवून शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Web Title: Looter on petrol pumps