लोणीच्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST2021-05-29T04:11:46+5:302021-05-29T04:11:46+5:30
तत्पूर्वी २६ मे रोजी जयकिसान कृषिसेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक अनियमितता आढळून आल्या. महाबीज कंपनीचे ...

लोणीच्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित
तत्पूर्वी २६ मे रोजी जयकिसान कृषिसेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक अनियमितता आढळून आल्या. महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे जेएस ३३५, वाणाचे १०० बॅग पैकी ३० बॅगचे बिले दुकानात माल उपलब्ध होण्यापूर्वीच जवळच्या शेतकऱ्यांच्या नावे दोन-तीन बॅगप्रमाणे बिले फाडून ठेवली. महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे दर कमी असल्याने तसेच त्याची उपलब्धता कमी असल्याने काळाबाजार करणे तसेच आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना विक्री करण्याचा ठपका ठेवण्यात आला. कृषिसेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत परवानगी असताना सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान चोर पद्धतीने शेतकऱ्यांना १७ बॅग सोयाबीन विक्री केली, असाही आरोप ठेवण्यात आला.
------------
कृषी निविष्ठांच्या बाबतीमध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने तालुक्यातील तपासणी मोहीम अजून अधिक व्यापक करू व जे अशा प्रकारे गैरप्रकार करतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर
---------------------
बियाण्यांचा दर कमी असल्याने शेतकऱ्यांची मागणी महाबीज बियाण्याला जास्त आहे. पुरवठा कमी असल्याने प्रशासनाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रतिशेतकरी तीन बॅग सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेमध्ये विक्री करण्याचे निर्देश दिले असतानाही संबंधित कृषिसेवा केंद्र संचालकाने दिलेल्या विहित वेळेव्यतिरिक्त जवळच्या शेतकऱ्यांना बियाण्याच्या बॅग विक्री केल्याचे निदर्शनास आले. यामुळे संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,अमरावती