Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील इटकी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:01 IST2019-03-27T14:00:38+5:302019-03-27T14:01:02+5:30

दर्यापूर तालुक्यातील इटकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने या निर्णयाप्रत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Lok Sabha Election 2019; Itkhi villagers of Amravati district boycott elections | Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील इटकी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील इटकी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

ठळक मुद्देमुलभूत सुविधांपासून वंचित तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील इटकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने या निर्णयाप्रत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावालगत असलेल्या गणेश नाला व मासोळी नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाल्यावरील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात इटकीपासून दर्यापूर- अंजनगावला जोडणाऱ्या रस्त्यावरून प्रवास अत्यंत कठीण होऊन जातो. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. गावातील आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, तर शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
दोन्ही पुलांचे बांधकाम, सांगळुद ते इटकी रस्त्याचे खडीकरण व गावातील स्मशानभूमीचा रस्ता बनवावा, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदने देण्यात आली. मात्र, समस्या अद्याप ‘जैसे थे’ आहे.
लोकप्रतिनिधींनीसुद्धा या ज्वलंत समस्येवर लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी श्रीकृष्ण चव्हाण, नीलेश गहले, अश्विन मोहोड, शरद गहले, धीरज तांबडे, भारत चौरपगार, सतीश मोहोड, शिवाजी म्हैसने, अनिकेत रोकडे, शरद इंगोले, धीरज वडतकर, अक्षय गायकवाड, पवन गावंडे, धम्मपाल रायबोले, योगेश आठवले, भूषण सपकाळ यांच्यासह श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्ही गावकरी भारतीय संविधानाचा आदर करतो. मात्र, गावासाठी महत्त्वाच्या असलेल्या पूलबांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मूलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- श्रीकृष्ण चव्हाण, अध्यक्ष, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, इटकी

Web Title: Lok Sabha Election 2019; Itkhi villagers of Amravati district boycott elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.