लॉकडाऊन काळात शाळांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:07+5:30

राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना टाळे लागलेले आहेत. आता काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. मात्र, लॉकडाऊन संपणार केव्हा व नवे शालेय सत्र सुरू होणार केव्हा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे.

Locked schools during lockdown | लॉकडाऊन काळात शाळांना टाळे

लॉकडाऊन काळात शाळांना टाळे

ठळक मुद्देनवीन सत्रातील प्रवेशाबाबत संभ्रम : विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : कोरोना (कोविड १९) विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना टाळे लागलेले आहेत. आता काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. मात्र, लॉकडाऊन संपणार केव्हा व नवे शालेय सत्र सुरू होणार केव्हा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील बहुतांश प्राथमिक शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता चवथी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश देण्याची लगबग सुरू होते. त्यासाठी अनेक शाळा आपली पटसंख्या कायम राहण्याच्या दृष्टीने आपापल्या स्तरावरून प्रयत्न करीत असतात. या सत्रात मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व शाळांना टाळे असल्यामुळे व प्रशासनाच्या कडक प्रतिबंधामुळे शिक्षक आपल्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्याच्या उद्देशाने बाहेर पडताना दिसून येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मोर्शी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इयत्ता पाचवी व आठवीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेशासाठी शहरातील नामवंत शाळांकडे नेहमीच धाव असते. परंतु, त्या शाळाही लॉकडाऊनमुळे बंद असल्याने पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश नेमका कोठे व कसा घ्यावा, याची चिंता सतावू लागली आहे. तसेच लॉकडाऊन केव्हा उघडणार, केव्हा शाळा सुरू होणार याबाबत सर्वत्र चर्चा झडच असल्याचे चित्र आहे.

Web Title: Locked schools during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा