वरूड तालुक्याच्या ग्रामीण भागात गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:18+5:30
लोकांनी घरातच राहावे, संचारबंदी सुरू आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. परंतु वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामसंरक्षण दल सक्रिय केले. प्रत्येक गावखेडे लॉकडाऊन करण्याकरिता गावातील मुख्य रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून गावबंदी केली आहे. ग्रामस्थ सुद्धा सहकार्य करीत आहेत. सतत पाळत ठेऊन युवक कोणालाही गावात येऊ देत नाही.

वरूड तालुक्याच्या ग्रामीण भागात गावबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : तालुक्यात १४० गावे असून, मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर हा तालुका आहे. दोन जिल्हे आणि एका राज्याची सीमा आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देश'लॉकडाऊन' आहे. लोकांनी घरातच राहावे, संचारबंदी सुरू आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. परंतु वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामसंरक्षण दल सक्रिय केले. प्रत्येक गावखेडे लॉकडाऊन करण्याकरिता गावातील मुख्य रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून गावबंदी केली आहे. ग्रामस्थ सुद्धा सहकार्य करीत आहेत. सतत पाळत ठेऊन युवक कोणालाही गावात येऊ देत नाही. ठाणेदार मगन मेहते आणि पोलीस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन नागरिकांच्या जीवीताची काळजी घेताना दिसत आहे.
ग्रामस्तरावरच्या समित्या कार्यान्वित
वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावखेड्यांत मुख्य रस्त्यावर बाहेरच्या लोकांसह वाहनांना गावबंदी करण्यात आली आहे. रस्ते बंद करण्यात आले. गावात बाहेर गावातून येणाऱ्या लोकांची नोंद ठेवण्यकरिता पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि ग्राम संरक्षण दल यांना सूचना देण्यात आल्या. सर्वत्र २४ तास गस्त घालून विनाकारण बाहेर दिसणाºया लोकांवर लक्ष ठेवले जात असल्याचे वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी सांगितले.