पुन्हा लॉकडाऊन, ८ मार्चपर्यत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:00 AM2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30

अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी ८ ते ३ या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत.

Lockdown again, extension till March 8 | पुन्हा लॉकडाऊन, ८ मार्चपर्यत मुदतवाढ

पुन्हा लॉकडाऊन, ८ मार्चपर्यत मुदतवाढ

Next
ठळक मुद्देअमरावती, अचलपूर, गुरुदेवनगर, भातकुलीसह अंजनगाव सुर्जीही कंटेनमेंट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही आता कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात १ मार्चच्या सकाळी ६ पासून ८ मार्चच्या सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांंनी सांगितले.
अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी ८ ते ३ या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. शासकीय कार्यालयांत १५ टक्के किंवा किमान १५ व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. ठोक भाजी मंडई पहाटे २ ते ६ या वेळेत सुरू राहील व त्यात केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. व्यायामशाळा, चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 

उर्वरित जिल्ह्यात मुभा सकाळी ९ ते ५ पर्यंत 
अमरावती लगतच्या बिझी लँड, सिटी लँड, ड्रिम लँड परिसर, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी, भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला.  तिथेही संचारबंदीचे हे आदेश लागू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर क्षेत्रांमध्ये यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Lockdown again, extension till March 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.