शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप

By admin | Updated: September 20, 2014 01:18 IST

रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने

अमरावती : रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. अतुल मदन इंगळे (२८, पाचबंगला नवीवस्ती, बडनेरा) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.सुशील रामदास लाखोडे हे वीज वितरण कंपनीत अभियंतापदावर कार्यरत आहे. ९ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी रहाटगाव येथे दोन इलेक्ट्रीक पोल नेण्यासाठी अतुल इंगळे याची रिक्षा २०० रुपयेप्रमाणे भाड्याने ठरविली होती. पोल घेऊन जात असताना बायपास मार्गावरील गोंडबाबा मंदिराजवळ अतुलची रिक्षा नादुरुस्त झाल्यामुळे त्याने रिक्षातील पोल त्याचा सहकारी जगनराव तुळशीराम थेटे (३५, रा. यशोदानगर) यांच्या रिक्षात टाकले व हे दोघे रहाटगावकडे जाण्यास निघाले. तेथे पोल उतरविल्यावर अतुलला लाखोडे यांनी २०० रुपये दिले. तेथे पैशांवरुन या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला जाताच अतुलने जगनराव यांच्या डोक्यात रॅप्टर मारुन त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने जगनराव यांचा रक्ताने माखलेला मृतदेह रहाटगावनजीकच्या असणाऱ्या गिरजाविहार कॉलनीजवळील एका झुडुपात फेकून दिला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले.