रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप

By Admin | Updated: September 20, 2014 01:18 IST2014-09-20T01:18:42+5:302014-09-20T01:18:42+5:30

रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने

Life imprisonment for rickshaw puller murder | रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप

रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप

अमरावती : रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. अतुल मदन इंगळे (२८, पाचबंगला नवीवस्ती, बडनेरा) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
सुशील रामदास लाखोडे हे वीज वितरण कंपनीत अभियंतापदावर कार्यरत आहे. ९ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी रहाटगाव येथे दोन इलेक्ट्रीक पोल नेण्यासाठी अतुल इंगळे याची रिक्षा २०० रुपयेप्रमाणे भाड्याने ठरविली होती. पोल घेऊन जात असताना बायपास मार्गावरील गोंडबाबा मंदिराजवळ अतुलची रिक्षा नादुरुस्त झाल्यामुळे त्याने रिक्षातील पोल त्याचा सहकारी जगनराव तुळशीराम थेटे (३५, रा. यशोदानगर) यांच्या रिक्षात टाकले व हे दोघे रहाटगावकडे जाण्यास निघाले. तेथे पोल उतरविल्यावर अतुलला लाखोडे यांनी २०० रुपये दिले. तेथे पैशांवरुन या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला जाताच अतुलने जगनराव यांच्या डोक्यात रॅप्टर मारुन त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने जगनराव यांचा रक्ताने माखलेला मृतदेह रहाटगावनजीकच्या असणाऱ्या गिरजाविहार कॉलनीजवळील एका झुडुपात फेकून दिला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

Web Title: Life imprisonment for rickshaw puller murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.