चार प्रकल्पांनी गाठली धोक्याची पातळी
By Admin | Updated: July 28, 2014 23:16 IST2014-07-28T23:16:45+5:302014-07-28T23:16:45+5:30
विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची

चार प्रकल्पांनी गाठली धोक्याची पातळी
अमरावती : विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे रविवारपासून धरणाचे १३ ही दरवाजे उघडण्यात आले. तसेच चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा, चंद्रभागा व सपन प्रकल्पदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत.या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. झालेली अतिवृष्टी, सोडण्यात आलेले धरणाचे पाणी यामुळे जिल्ह्यातील ३० ते ४० गावात पुराचे पाणी घुसल्याने ४ हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात १ मोठा उर्ध्व वर्धा, ४ मध्यम शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन तसेच ११८ मध्यम प्रकल्प आहेत. उर्ध्व वर्धा धरणाचे पाण्यासाठी प्रमुख स्त्रोत मध्यप्रदेशातून येतो. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडल्याने धरणाने ३४२.०४ ही महत्तम पाण्याची पातळी गाठली. परिणामी रविवार २७ जुलै रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वर्धा नदीला पूर येऊन धामणगाव तालुक्यामधील बगाजी सागर धरण धोक्याच्या पातळीवर आले. चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा व चंद्रभागा धरणाने धोक्याची पातळी गाठली. यामुळे ४ हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.