शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भूजलात १२ फुटांपर्यंत कमी, ४५५ गावांत पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:33 IST

यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’चा शासनाला अहवाल : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी कार्यवाही आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. संभवत: यंदा किमान ४५५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आलेले आहे. यासाठी संभाव्य टंचाईच्या गावांत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी आतापासूनच कार्यवाही करणे आवश्यक झालेले आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. यामध्ये १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. मात्र, यंदा अल्यप पर्जन्यमानामुळे ही विपरीत स्थिती जिल्ह्यावर ओढावली असल्याने स्त्रोत बळकटीकरणासोबत अस्तित्वातील पाणीपुरवठा साधनांची देखभाल दुरूस्तीदेखील तेवढीच महत्वाची आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातीळ गावे डोंगराळ भागात आहेत. तेथील भूस्तराची जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. यंदा मेळघाटात पाऊसदेखील कमी झाल्याने जानेवारीपासूनच पाणीटंचार्ईची झळ पोहोचणार आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्याच्या काही भागात यंदा भीषण पाणीटंचार्ई राहणार आहे.जिल्ह्यातील नऊ लघुपाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीमध्ये २ ते ३ मीटरपर्यंत तूट आढळून आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६८ गावांना, तसेच सात तालुक्यातील ९ लघुपाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये ३ ते ४ मीटरपर्यंत तूट आढळून आल्याने जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ९५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातील गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे.मात्र, भूजल पातळी खोल गेल्याने या तालुक्यातही पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्ह्यातील काही भागात भौगोलिक व भूशास्त्रीय परिस्थितीमुळे तसेच रबी पिकांसाठी होणाऱ्या अमर्याद उपश्यामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत कमी कालावधीतच कमी येण्याची शक्यता आहे.वरूड, मोर्शी तालुक्यातनवीन विहिरींसह उपशावर बंदीवरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसिढत पाणलोट क्षेत्र असल्यामुळे व बारमाही ओलीतक्षेत्र जास्त असल्यामुळे विहिरी व सिंचन विहिरींद्वारे भुजलाचा उपसा फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार भुजल उपश्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे व याच भागात अधिनियम आठ (१) मधील तरतुदीनुसार बंदी घालण्याची शिफारस भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे.पाणीटंचाई : कालावधी व गावेपाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणलोट क्षेत्रात अंतर्भूत आमरावती, धारणी, भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, मोर्शी व वरूड तालुक्यामध्ये ९५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत अमरावती, भातकुली, चांदूर बाजार दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा, अंजनगाव सुर्जी व वरूड तालुक्यात ६८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे.एप्रिल ते जून या कालावधीत अमरावती, धारणी, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड व तिवसा या तालुक्यातील ३०२ गावांत पाणीटंचाई राहील.यंदा भूजल पूनर्भरण झालेले नाही. गत पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. कलम २५ नुसार संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई घोषित करण्याची संदर्भात माहिती देण्यात आली.- विजय कराड, उपसंचालक, जीएसडीए