शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

परतवाड्यात बिबट्याचा मृत्यू , ३७ दिवसांपासून सुरू होते उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 7:59 PM

तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला.

परतवाडा (अमरावती) : व्याघ्र प्रकल्पाच्या परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला चार वर्षीय नर बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३७ दिवसांपासून त्याच्यावर येथे उपचार सुरू होते. १ जून रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला. अचलपूर तालुक्यातील खैरी दोनोडा गावानजीक खैरी शिवारात अमरावती प्रादेशिक वनविभागांतर्गत परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी, कर्मचाºयांसह रेस्क्यू टीमने या बिबट्यास २५ एप्रिलला जेरबंद केले होते. या जेरबंद बिबट्याचा मागील पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकला होता. यात त्याचे मागचे पायाला जखम झाली होती. या जखमी बिबट्याला २५ एप्रिललाच प्रादेशिक वनविभागाने परतवाड्यातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला दाखल केले. तेव्हापासून हा बिबट सिपना वन्यजीव विभागाच्या देखरेखीखाली होता. उपवनसंरक्षक शिवाबाला एस. व डॉ. अक्षय घटारे या बिबट्याच्या सरळ संपर्कात होते. पहिले तीन दिवस या बिबट्याने आहार घेतलाच नव्हता. चिकन टाकले असता त्याने खाल्ले नव्हते. नंतर बोकडाचे मांस त्याला दिले गेले. गोरेवाडा (नागपूर) स्थित विभागीय व्यवस्थापक वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात या बिबट्याचे दोन वेळा रक्त नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यात लिव्हरची समस्या पुढे आली होती.दरम्यान, बिबट्याच्या पायाच्या जखमेवर खपली धरली होती. पायावर तो उभाही राहत होता. दहा-बारा दिवसांपूर्वीच ‘स्क्वीज केज’मधून त्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडायला हवे होते. पण, सुकलेल्या जखमेवर केस येऊ द्या, मग सोडू, या विचारात त्याला स्क्वीज केजमध्येच अडकवून ठेवले गेले. मृत्यूपूर्वी त्याने आहार घेणे कमी केले अन् फणफणत्या तापात  प्राण सोडले.बिबट्याच्या शवविच्छेदनानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या बाजूलाच त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले. अंत्यसंस्काराला उपवनसंरक्षक शिवाबाला एस., उपवनसंरक्षक अविनाश कुमार व पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, विशाल बन्सोड, डॉ. अक्षय घटारे यांच्यासह वनरक्षक, वनपाल उपस्थित होते. अचलपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एम. कावरे आणि डॉ. कलोरे यांनी शवविच्छेदन केले.

ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. या तापातच तो मरण पावला. - शिवाबाला एस., उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा.

टॅग्स :leopardबिबट्याAmravatiअमरावती