लिंबाचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:16+5:30

कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मे महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल जुलै महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. बाजारपेठ नसल्याचे सांगत व्यापारीदेखील हा शेतमाल खरेदी करण्यासाठी फिरकले नाहीत.

Lemon prices plummeted | लिंबाचे भाव गडगडले

लिंबाचे भाव गडगडले

ठळक मुद्देव्यापारीही फिरकले नाही : उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : लिंबू उत्पादक शेतकऱ्यांपुढे कोरोनाकाळात आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एक तर भाव गडगडले, त्यात व्यापारी बागांकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत. परिणामी झाडावरील लिंबू गळून मातीत मिसळत आहेत.
कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मे महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल जुलै महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. बाजारपेठ नसल्याचे सांगत व्यापारीदेखील हा शेतमाल खरेदी करण्यासाठी फिरकले नाहीत. सद्यस्थितीत लिंबाच्या एका गोणीला ७०-८० रुपये असा दर मिळतो. हे लिंबं तोडण्यासाठी ४०-५० रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर वाहतूक व बाजारपेठेतील इतर खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही. या गणिताची जाण असल्याने अनेक शेतकºयांना बागेतील लिंबू झाडावरच पक्व होऊ देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एकदा पक्व झालेली लिंबं गळून मातीत मिळत आहेत.
उन्हाळ्यात लिंबूला चांगली मागणी असते. पण, यंदा कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन कालावधीत रसवंती, हॉटेल, लिंबू सरबतची दुकाने बंद होती. त्यामुळे लिंबाला मागणी नव्हती. बाजारपेठेचाही प्रश्नच होता. परिणामी लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: Lemon prices plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.