शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:00 PM

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देविजेची प्रतिमाह १३०० कि.वॅटची बचत : देयकातही ४० लाखांनी कपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ३० ते ४० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ४० लाखांची कपात झालेली आहे. मात्र, यासाठीच्या देखभाल दुरूस्तीमध्ये सद्यस्थितीत कमी पडत असल्याचे वास्तव आहे.महापालिका क्षेत्रात एनर्जी एफिशिएंशी सर्विसेससोबत एलईडी लावण्यासाठीचा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकाश विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात सद्यस्थितीत ३६ हजार ६६० एलइडी पथदिवे लावले आहेत. ऊर्जा बचतीच्या धोरणासोबत जुने परंपरागत अधिक क्षमतेच्या एलईडी दिव्यांनी बदलून अधिभार तसेच देयकाची रक्कम कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी महापालिकेचा ‘इइएसएल’ या कंपनीसोबत २५.७७ कोटींचा पीपीपी तत्वावर करारदेखील झाला आहे. आता या कराराची मुदत संपल्याने देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या शिरावर आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात आऊट स्कर्ट एरियातील पथदिव्यांच्या अडचणी कायम असल्याविषयीचा प्रस्ताव काँग्रेसचे प्रशांत डवरे यांनी सभागृहात मांडून प्रशासनाला धारेवर धरले. नव्याने विकसित होणाºया भागात पथदिवे लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. १, २ दिवे असल्यास नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून लावता येतील परिसरात एलईडी लावणे या निधीतून शक्य होणार नसल्याने यासंदर्भात नवीन धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली. अनेक टिकाणी पथदिवे लटकत आहेत. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल देखील त्यांनी प्रशासनास विचारला आहे. त्यामुळे सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. महापालिकेची वीज वापरात जवळपास प्रतिमाह ४० लाखांनी बचत होत असल्याने शहरातील पथदिव्याच्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.अशी झाली वीजभार, देयकात बचतजुन्या परंपरागत दिव्यांचा वीज अधिभार जवळपास ३५३७ किलोवॅट होता. यामध्ये १०० ते २०० वॅटपर्यंतची ट्युबलाईट, सोडीयम व्हेपर व मरक्युरी लाइट होते. आता एलइडी लावल्याने २२०० किलोवॅटपर्यंत याचा वीज अधिभार आहे. महापालिकेद्वारे सरासरी ११ तास पथदिवे सुरू राहतात. यापूर्वी महापालिकेला एक कोटी १५ लाखांपर्यंत वीज देयके यायचे. आता विजेची बचत होत असल्याने ७५ ते ८० लाखांपर्यंत वीज देयके येत आहेत. यामध्ये साधारणपणे ४० लाखांपर्यंतची बचत होत असल्याची माहिती प्रकाश विभागाने दिली.असे लागले शहरात एलईडीकरारनुसार १८१ एलईडी लावण्यात आले. तर ५८३ जुने पथदिवे बदलण्यात आले. हायमास्टवर १५२८ फ्लडलाईट्स बदलविले. डमी पोलवर ५१९ एलईडी लावण्यात आले. उड्डाणपुलाखाली साधारणपणे २०० फ्लड लाईट्स लावले आहे. वाढीव पथदिव्यांची समख्या ३०११ आहे. एमओयूपूर्वी ही संख्या ३३ हजार ९१७ होती. एलइडी दिव्यांची सुधारित संख्या ३६ हजार ३४८ असल्याचे सांगण्यात आले.