नातू झाला तरी सासरी छळ सुरूच, ग्रामीण भागात तक्रारी जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:20+5:302021-06-17T04:10:20+5:30
अमरावती/ संदीप मानकर महिलेचे लग्न झाले. काही वर्षे संसार सुखात चालला. त्यानंतर मात्र पती, सासू व सासरकडच्या मंडळीकडून छळ ...

नातू झाला तरी सासरी छळ सुरूच, ग्रामीण भागात तक्रारी जास्त
अमरावती/ संदीप मानकर
महिलेचे लग्न झाले. काही वर्षे संसार सुखात चालला. त्यानंतर मात्र पती, सासू व सासरकडच्या मंडळीकडून छळ सुरूच राहिला आता नातू झाला तरी महिलांचा छळ सुरूच आहे. अशा काही तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.
कोरोनाकाळात व लॉकडाऊनमध्येसुद्धा तक्रारी वाढल्या असून, पत्नीचा छळ करण्यात आल्याच्या यामध्ये ग्रामीण भागात २०२० या वर्षात ३८५ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या, तर २०२१ मध्ये पाच महिन्यांत १८४ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामीण भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा यांनी दिली.
कोरोनाकाळात पोलीस आयुक्तलयात असलेल्या शहर भरोसा सेलकडेसुद्धा शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ग्रामीणमध्ये २०२० मध्ये प्राप्त झालेल्या ३८५ तक्रारींपैकी भरोसा सेलच्या पोलिसांच्या टीमने पती- पत्नीचे समुपदेशन करून ७५ प्रकरणांत समेट घडवून आणला. १७६ प्रकरणांत भादंविचे कलम ४९८ दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्यात पाठविण्यात आले. २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत प्राप्त झालेल्या १८४ प्रकरणांमध्ये ३५ जणांचे समेट घडवून आणण्यात यश आले. १३० प्रकरणे कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात आली. सोशल मीडियावरून पत्नीवर संशय घेणे, माहेरहून हुंडा आण्याकरिता छळ करणे तसेच इतर लहान-लहान गोष्टींवर सासरकडच्या मंडळीकडून महिलेचा छळ झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहे.
ग्रामीण भागात गुन्ह्याची कमालीची वाढली
२०२० मध्ये जिल्ह्यात ४९८
अंतर्गत दाखल गुन्हे -२४८
शहरी भागात किती? - ७२
ग्रामीण भागात किती? -१७६
२०२१ (मे पर्यंत) जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे
ग्रामीण भागात किती? - १३०
शहरी भागात किती? - ३१
अंतर्गत दाखल गुन्हे -१६१
बॉक्स:
पत्नाशी ओलांडली तरी छळ सुरूच
१)
नवीन लग्न, काही महिन्यांचा संसार हा कालावधी पती-पत्नीच्या वादावादीचा असतो व याच कालावधीत ही प्रकरणे पोलिसांत जातात. मात्र, काही प्रकरणे पत्नाशी ओलांडलेल्या पत्नींची आहेत. त्यांचा या वयातही छळ सुरूच असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या.
२) सोशल मीडियामुळे संसार अर्ध्यावर मोडल्याची काही प्रकरणे पोलिसांसामोर आली. लग्न झाल्यानंतर पत्नी फक्त फेसबूक, व्हॉट्सॲपवर राहत असल्याने नवऱ्या हटकले. त्यानंतर मात्र भांडणे सुरू झाली. सर्वाधिक तक्रारी या माहेरहून पैसे आणण्याकरिता मानसिक छळ केल्याच्याच्या पोलिसांकडे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बॉक्स:
बाहेरच्या नादाने मोडला संसार
ग्रामीण पोलिसांकडे एक जिल्हा परिषद शिक्षकासंबंधी दाखल झाले आहे. त्याला मद्याचे व्यसन आहे. सुविद्य पत्नी व दोन मुले असतानाही बाहेरचा नाद असल्याने संसार मोडला आहे. पत्नीला छळाला सामोरे जावे लागल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.
कोट
गतवर्षी ३८६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आमच्या टीमने समुपदेशन करून ७५ प्रकरणांत समेट घडवून आणला. त्यांचा चांगला संसार सुरू आहे. यंदा लॉकडाऊनमध्येसुद्धा सर्वाधिक १८४ तक्रारी आल्या. त्यापैकी ३५ जणांचा समेट झाला. आम्ही यशस्वी प्रयत्न करून समेट घडवून आणतो. पण, काही प्रकरणांत पर्यायच नसतो त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात येते.
- कान्होपात्रा बन्सा, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल (ग्रामीण)